पान:मेणबत्त्या.pdf/255

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२२७

शेवटें चाकूनें साफ करावी. याप्रमाणें मेणबत्तीची पेटविण्याची कळीदार बाजू खालीं व वूड वर अशा स्थितीत सर्व मेणबत्या ओतल्या जातात. हात-साचांत मेणबत्या ओततांना वरची ५ कामे करावी लागतात. तयार झालेल्या मेणबत्त्या कागदांत गुंडाळून पुडकी बांधण्यास प्याकीं- गचे खोलींत पाठवाव्या.

हे साचे एकदम थंड करण्यास त्यांत साधन नसल्यानें प्याराफीन

किंवा स्परस्यासिटीच्या मेणबत्या यांत ओतीत नाहींत. ते काम मोठ्या साचाच्या पेटींत करतात.

२. दोन्ही प्रकारच्या मोठ्या साचांच्या पेठ्यांत मेणबत्यांचें ओतकाम

करण्याची माहिती-मागे सांगितल्याप्रमाणें आकृती नंबर७व ८ पैकी कोणत्याही एका प्रकारचा साचांच्या मोठ्या पेट्या दोन समोरासमोर ओतकाम कर- ण्याच्या खोलीच्या मधोमध मांडून ठेवल्या आहेत. त्यांचें इतर सामान व्यवस्थित व तयार आहे. मेणबत्त्या ओतण्याचें द्रव्य पातळ करून ठेवले आहे. पाहिजे त्या प्रकारच्या वाती गुंडाळलेली चार्के तयार आहेत. बायलर मधून वाफ आणणारी नळी व टाक्यांतून थंड पाणी आणणारी नळी यांचा संयोग म जवळील जोड नळ्यांशीं केलेला आहे. इतकी तयारी झालेली आहे. आतां मेणबत्यांचें ओतकाम करणें आहे.

१ साचांत वाती ओवर्णे - द्रव्याच्या जातीप्रमाणे पाहिजे त्या

वाती गुंडाळलेली चाकें ड दव्या खालच्या खिळ्यावर फिरतीं लागू करावी. फ दांडा फिरवावा झणजे डडट्ठे साचांतून वर येऊन त्यांच्या वरच्या काठा- शीं समांतर रहातील इतका तो फ दांडा फिरवावा. नंतर साचाच्या लांबीच्या दुप्पट लांबीपेक्षां दोन इंच अधिक लांब अशी एक लोखंडी तार घ्यावी. ती दुहेरी करावी. नंतर तिचा दुमटलेला भाग एका दट्याच्या पृष्ठभागावरील छिद्रांत घालून खालीं ढकलावा. ह्मणजे त्या साचाच्या खालच्या शेवटा बाहेर व त्या दट्याबाहेर आणि त्या दव्याखालच्या वात .