पान:मेणबत्त्या.pdf/254

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२२६

गच बांधावी. ह्मणजे साचांत ती वात मधोमध व ताठ रहाते. याप्रमाणें सर्व साचांत वाती ठेवून त्या न हाळतां त्यांच्या मधोमध गच्च राहतील अशा बांधाव्या. ● C

२ साचे गरम करणे - विस्तवानें ( बिनधुराची) भरलेली शेगडी

साचाखाली ठेवून ते ११० - १३० फा. अंशापर्यंत गरम करावे. साचे व पातळ द्रव्य गरम करण्याची विशेष माहिती पुढे दिली आहे, ती पहा,

३ साचांत पातळ द्रव्य ओतणें- पातळ केलेल्या स्टिअरीनचें मि-

श्रण ओतण्याच्या लहान व धार असणाऱ्या भांड्यांत घ्यावें. या लहान भांड्यांत ते पातळ द्रव्य थिजण्याच्या बेतांत आलें हाणजे साचावरच्या उघड्या पेटीत हलके हलके ओतून द्यावें. पातळ द्रव्याने सर्व साचे भरल्यानंतरही वरच्या उघड्या पेटींत साचांच्या तोंडापासून २-३ इंच उंच ( जाड ) राहील इतकें पातळ द्रव्य त्या पेटींत ओतावें. कारण मेणबत्या थंड होतांना अकुंचनाने त्यांचा आकार किंचित् कमी होत असतो. सबब त्यांत भर घालण्यास उघड्या पेटींतील जास्त द्रव्य उप- योगी पडतें, साचाखालची उष्णता काढून टाकावी. नंतर अर्धातास थांबावें ह्मणजे त्या सांचांत ते पातळ द्रव्य थंड होऊन मेणबत्त्या त्यांच्या मध्यापर्यंत (वातीपर्यंत ) घट्ट होतात.

४ दोरे कापणे- साचांतील मेणबत्त्या घट्ट झाल्यावर वरच्या

उघड्या पेटीतील अधिक द्रव्य कलथ्यानें खरवडून काढून लोखंडी टोपलीत ठेवावें. नंतर मेणबत्त्यांच्या बातींचीं दोनही शेवटें चाकूनें कापून टाकावी. PICK १५ मेणबत्त्या साच्याबाहेर काढणें- दरेक साचतील वार्ताचें वरचे शेवट हलकेच वर ओढावें, ह्मणजे मेणबत्ती साचाबाहेर निघते. लवकर साचाबाहेर न निघाल्या तर साचे किंचित् गरम करावे, ह्मणजे मेगबव्या लवकर बाहेर निघतात. नंतर मेणबत्यांची वरची ह्मणजे जाड त्या