पान:मेणबत्त्या.pdf/251

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२३ ४. खोली-द्रव्य पातळ व कोरडे करण्याच्या दोन्ही प्रकारच्या कढया मांडण्यास निराळीच खोली असावी. जर हे काम मेणबत्त्या ओतण्याच्या खोलीत केले, तर लोखंडी वेष्टणांतून निघणारी निरुपयोगी वाफ, निराळ्याच व मुद्दाम ठेवलेल्या नळीत सोडून देऊन नाहीशी करावी लागते. नाहीतर ही निरुपयोगी वाफ सुटी राहिल्याने ओतकाम चांगले होऊ शकत नाही व तेथील दुसऱ्या पदार्थावर किंवा कोरड्या द्रव्यांतही मिश्र होऊन काम बिघडते. वाफेच्या मोठ्या नळीस लहान नळी जोडून लोखंडी वेष्टणांत सोडतात. या नळीतून वेष्टणांत वाफ येते. या प्रमाणे मेणबत्त्यांचे द्रव्य पातळ करण्याची भांडी व त्यास लागणाऱ्या उष्णतेच्या साधनांची व्यवस्था करावी. काम ४ थे-साचांत वाती ओवण्याची व्यवस्था-वातीच्या भागांत सांगितल्याप्रमाणे वाती एकदम तयार करून ठेवाव्या. नंतर ज्या द्रव्यास ज्या प्रकारच्या वाती लागतील या वाती घेऊन साचांत ओवाव्या लागतात. सर्व हातसाचांत एकेक मेणबत्तीच्या लांबीची एकेक वातच दर वेळेस ओवावी लागते. यायोगें श्रम व वेळ अधिक लागतो. परंतु दोन्ही प्रकारच्या मोठ्या साचांत एकच एक वात पुरी होईपर्यंत आपोआप वर सरकली जाते. अशी लांब वात एका लोखंडी चाकावर एक गुंडाळून ठेवावी. अशी पुष्कळ चाके तयार करून कोठारांत ठेवावी. वात गुंडाळले एक चाक एका साचाखालच्या खिळ्यावर लागू करून ठेवावे. या प्रमाणे सर्व साचाखाली वाती गुंडाळलेली चाके ठेवावी. वातीचे शेवट तारेत अडकवून एकदा ड दट्याच्या भोकांतून वर व नंतर साच्याच्या पोकळीतून वर काढले ह्मणजे त्या चाकावरील वात संपेपर्यंत ती तशीच वर ओढली जाते. वात संपल्यास ते रिकामें चाक काढून . त्या ठिकाणी वात गुंडाळलेले दुसरें चाक ठेवावें.