पान:मेणबत्त्या.pdf/250

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२२ त्यांत मिश्र होते. ते पाणी या भोकांतून काढून त्या खाली ठेवलेल्या दुसऱ्या भांड्यांत धरून ठेवतात. ते थंड झाल्यावर त्या पाण्यांत चुकून आलेलें मेण असेल ते काढून घेऊन पुनः उपयोगांत घ्यावें. २. कोरड्या करण्याच्या कढया-(ड्राईंग प्यान्स)-वाफेने पातळ केलेल्या द्रव्यांत थोडे पाणी असते ह्मणून ते लाकडी कढयींतून दुसऱ्या कढयींत कोरडे करण्याकरितां सोडावे लागते. यांसच कोरड्या करण्याच्या कढया ह्मणतात. प्याराफीन मेणांत स्टिअरीन मिश्र केल्यानंतर या मिश्रणास लोखंडाचा स्पर्श होऊ देऊ नये. कारण स्टिअरीन हे वनस्पतिज आसीड ( अम्ल ) आहे. ह्मणून त्याचा स्पर्श लोखंडास किंवा पितळेस झाला तर हिरवा काट उत्पन्न होतो. सबब या कोरड्या करण्याच्या कढया मातीच्या किंवा लोखंडाच्या करून त्यांस आंतून चिनई मांड्यासारखी कल्हई केलेली असावी. क्वचित कोणी लोखंडी कढयास आंतून चांदीचे पत्रे जडवितात, या कढया एका लोखंडी वेष्टणांत गच्च बसवितात. लोखंडी वेष्टणांत वाफ सोडली ह्मणजे त्या गरम होऊन त्यांतील द्रव्य कोरडे होते पण पातळच रहाते. वरील दोन्ही प्रकारच्या कढयांचे माप साचांच्या जितक्या पेट्या असतील त्या मानाने जितकें द्रव्य लागेल त्या प्रमाणांत ठेवावे. याचा खुलासा कलम ९ मध्ये पहा. ३. कोरडे व पातळ द्रव्य कढयांतून साचांत ओतण्याची लहान भांडी-हे दरेक भांडे. पातेल्यासारखे असून त्यास धरण्यास दांडा व धार पडण्यास त्याच्या कां च्या एका बाजूस खाचा पाडलेला असतो. हे भांडे लाकडी किंवा लोखंडी असते. लोखंडी असल्यास वरच्या कढयाच्या कल्हई सारखी कल्हई त्यास आंतून केलेली असावी. दरेक भांड्यांत सुमारे १६ शेर पातळ द्रव्य राहील इतके ते मोठे असावें. जितक्या पेट्या असतील तितकी ही लहान भांडी वरप्रमाणे तयार करून ठेवावी.