पान:मेणबत्त्या.pdf/249

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२१ २. पहिल्या प्रकारच्या पेटीच्या आजूबाजूस असणारी गटरें या दुसऱ्या प्रकारच्या पेटीत नसतात. या पेटीच्या बाजूस व दोन पेट्यांमध्ये नळ लावून त्या नळांतून पेटीतील पाण्याचा निकाल खालच्या मोरीत करतात. यायोगे गटरांस लागणारी जागा या प्रकारच्या पेटीत कमी करता येते. इतका फेरफार या दुसऱ्या प्रकारच्या पेटीत असतो. बाकीचे सामान पहिल्या प्रकारच्या पेटीच्या सामानाप्रमाणेच असते. याप्रमाणे ज्या 'त्या प्रकारच्या साचाच्या पेटीचे सामान तयार करून जेथल्या तेथें व्यवस्थित लागू करून ठेवावें. काम ३ रें-मेणबत्त्यांचे द्रव्य पातळ करण्याची भांडी व ती गरम करण्यास उष्णतेची योजना-१. मेणबत्त्यांचे द्रव्य प्रथम लाकडी कढयांत गरमीने पातळ करतात. या कढया लाकडी मजबूत असून त्यासभोंवती मजबूत लोखंडी पट्ट्यांची वेष्टणे लावतात. या कढयांत टाकलेले द्रव्य पातळ करण्यास त्यांत वाफ सोडावी लागते. ती वाफ आणण्यास या दरेक कढयीचे आंतील भागावर, भोके पाडलेली तांब्याची नळी चार पांच वेढे देऊन बसविलेली असते. या नळीच्या भोकांतून निघालेली वाफ कढयींतील द्रव्यांत शिरते, मणजे तें द्रव्य पातळ होत जाते. वाफ आणण्यास्तव या नळीचा संयोग बायलरच्या वाफेच्या नळीशी केलेला असतो. पातळ झालेल्या द्रव्यांत वाफेचे पाणी थोडेसें मिश्र असतें तें काढून टाकण्यास तें द्रव्य पुनः दुसऱ्या कढयींत सोडून तेथें चांगले कोरडे करतात.या लाकडी कढयीच्या तळाजवळ बाहेरच्या एका बाजूस एक पितळी मोठा काक लागू करावा.या काकमधून ते पातळ द्रव्य दुसऱ्या कढयींत जाऊ शकतें या लाकडी कढया उंच जागेवर ठेवाव्या ह्मणजे त्यांतील पातळ द्रव्य दुसऱ्या कढयांत नेण्याचे काम सोयीवार होऊ शकतें. या लाकडी कढयींच्या तळी एकेक भोक ठेवलेले असते; व या भोकास एकेक सुटा दट्या मारलेला असतो. कढयींतील द्रव्य पातळ करतांना वाफेचे पाणी