पान:मेणबत्त्या.pdf/247

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१९ म जवळ दोन कॉक व दरेक पेटीत शिरणाऱ्या जोड नळ्यास त्या पेटीच्या बाहेरच्या बाजूस दोन दोन कॉक ल गू करावे, म जवळचे कॉक उघडल्याने दरेक पेटीच्या बाहेरच्या बाजूच्या कॉकपर्यंत वाफ व पाणी येते; व पेटीच्या बाहेरच्या बाजूचे कॉक उघडल्याने अ पेटींत वाफ व पाणी येतें, जोड नळीस दोन कॉक ठेवावयाचे त्यां पैकी एक पाण्याच्या नळीस व दुसरा वाफेच्या नळीस जोडावा लागतो, ह्मणजे पाहिजे तो पदार्थ त्या त्या नळीवरील काक फिरविल्याने अ पेटीत सोडतां येतो, या योजनेने साचे गरम किंवा थंड करण्याचे काम सोयीवार, जलद व नियमित होऊ शकते. १५ सळया-पहिल्या खेपेस साच्यांत ओंवलेल्या वाती साच्यावरच्या भागी गच्च बांधण्यास काही साधन लागते. साच्यांच्या दरेक ओळीवर एकेक लोखंडी सळई आडवी ठेवून तीस वाती गच्च बांधाव्या. साच्याच्या ओळींच्या प्रमाणाने या सळयांची संख्या असावी. या शिवाय कलथे, चाकू, लोखंडी टोपल्या, व रुमाल वगैरे सामान मागें सांगितल्याप्रमाणे व पेट्यांच्या संख्येच्या मानाप्रमाणे तयार करून ठेवावें. ३ मोठ्या साचांची पेटी प्रकार २ रा–या साचांत मेणबत्त्या बरोबर त्यांची बोंडेही तयार होऊ शकतात. ही पेटी पहिल्या प्रकारच्या पेटीप्रमाणेच बहुतेक असते. फक्त ड दट्ट्यांत तफावत असते. त्यायोगें मेणबत्तीस बोंड तयार होते. ह्मणून या साचांनी ओतकाम करताना वेळ, श्रम व वाती, यांचा बचाव होतो. असे साचे मि० कावलीज यांनी व राचडेल येथील मि० बर्लो यांनी इंग्लंडांत व पारीस येथील मा. गाल आब्रान फेरीज यांनी बनविले आहेत. युरोपखंडांत पारीस येथील असे साचे बहुतेक सर्व कारखानदार वापरतात.