पान:मेणबत्त्या.pdf/243

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३ चौकटी-साचाची पेटी ठेवण्यास लाकडी किंवा लोखंडी चौकट लागते. सबब अशा ९ चौकटी तयार करून ठेवाव्या. दोन चौकटी समोरासमोर मांडून त्यांवर दोन अ पेट्या गच्च बसाव्या, व आजूबाजूस काम करण्यास पुरेशी खुल्ली जागा ठेवावी. दोन माणसें नऊ पेट्यांबर काम करू शकतात. ४ गटर-दोन पेट्यांमध्ये व त्यांच्या एका बाजूने लोखंडी पत्र्याची गटरें लागू करून ठेवावी. या गटरांतून बंद पेट्यांतील पाणी बाहेर सोडून त्याचा निकाल खाली असलेल्या मोरीत करावा. ५ ब—हे तारेचे गोलाकृति चिमटे आहेत. हे चिमटे एका लोखंडी कांबीवर गच्च बसवितात. एका ओळींत जितके साचे असतील तितके चिमटे त्या एका कांबीवर बसवावे. साचांच्या ओळी इतक्या कांबी लागतात. दरेक कांब साचाच्यावरील उघड्या पेटीच्या भागापासून थोडी उंच राहील अशी ठेवावी; व ती वरखाली सरकवितां येईल अशी लागू करावी. हे चिमटे पाहिजे तेव्हां उघडे व पाहिजे तेव्हां बंद करता येतील अशा रीतीचे असावे. घट्ट झालेल्या मेणबत्त्या साचाबाहेर काढल्यानंतर याच ब चिमट्यांत पकडल्या जातात. नंतर ती कांब वर सरकविली ह्मणजे साचापासून वर उंच जाऊन मेणबत्त्या साचाच्यावर व मधोमधा, लाबेंत रहातात. असे चिमटे चिकटविलेल्या कांबी पेट्यांच्या संख्येप्रमाणे पाहिजे तितक्या तयार करून पेट्यावर लागू करून ठेवाव्या. ६ क-हा ब चिमटे असणाऱ्या कांबीचा दांडा आहे. हा फाचरीसारखा असतो. हा पुढे ह्मणजे चिमट्याकडे ढकलला तर चिमट्यांची तोंडे उघडली जातात. नंतर चिमट्यांत मेणबत्त्या आल्यानंतर हा दांडा मागे ढकलला तर ते चिमटे मिटले जातात. चिमटे मिटले गेले झणजे त्यांत पकडलेल्या मेणबत्त्या गच्च राहू शकतात.