पान:मेणबत्त्या.pdf/242

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

है अ-ही एक लोखंडी बंद पेटी आहे. हिच्यांत साचे गच्च बसविले आहेत. साचांच्या चार ओळी असून त्यांत ८०-१२४ पर्यंत साचे ठेवता येतात. ही पेटी सहा बाजवांची असून तिचा खालचा पाऊण भाग बंद व वरचा भाग उघडा असतो. पेटीच्या वरच्या व खालच्या पत्र्यांस भोंके पाहून त्यांत साचे उभे व गच्च बसविले आहेत. साचाचा खालचा भाग थोडासा पेटीबाहेर व वरचा भाग वरच्या पत्र्याशी समांतर राहील असे ते त्या पेटीत बसविले आहेत. पेटीच्या दोन्ही पत्र्यांमधील साचांचा सर्व भाग चोहोंकडून बंद असतो. या बंद पेटींतून पाणी जरा पण बाहेर जाऊं नये, अशी मजबुती केलेली असते. साचांच्या वरच्या तोंडाभोवतालचे अ पेटीचे उभे ४ पत्रे, साचावरच्या तोंडाच्या पृष्ट भागापासून चार इंच जास्त उंच ठेवले आहेत. यायोगें साचांच्या वरच्या तोंडासभोवतीही एक उघडी पेटी तयार होते. याच उघड्या पेटीत पातळ द्रव्य ओततात, ह्मणजे तें साचांत भरते. बंद असणाऱ्या साच्यासभोंवती पाणी आणण्यास व ते सोडण्यास, कॉकसहित जोडनळ्या बंद पेटीत लागू केल्या आहेत. या पेटीमधील नळ्यांचा संयोग, पेटीवरच्या किंवा बाजूच्या भागीं दुसया नळ्याशी केलेला असतो. यायोगे त्यांतून वाफ किंवा पाणी पेटीत सोडल्याने तिच्यांतील साचे गरम किंवा थंड करता येतात. या बंद पेटीत जोडनळ्या साचांच्या ओळींमध्ये लागू करून त्यांतून गरम किंवा थंड पाणी अथवा वाफ सोडून ते साचे कमीजास्त वेळांत गरम किंवा थंड करतात. २ साचे-मेणबत्त्या ओतण्याचे साचे लोखंडी पातळ पत्र्याचे केलेले असतात. दरेक साचा हातसाचांच्या पेटीतील साचाप्रमाणेच तयार करावा. असे साचे दरेक ओळीत २०-३१ पर्यंत बसवावे. अशा चार ओळी एका अ अशा बंद पेटींत लागू कराव्या. यांची संख्या पव्यांच्या प्रमाणाने असावी. साचाचा आकार आकृती नं.८ मध्ये पहा..