पान:मेणबत्त्या.pdf/241

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

म या साचांत मेणबत्त्या ओतण्याचे बहुतेक काम यांत्रिक साधनांनी केले जाते. यांत तयार होणारी मेणबत्ती फुकणीसारखी दोन्ही तोंडें गोल असणारी निघते, या मेणबत्तीस नंतर पुढचे बोंड तयार करतात. वाती लांबच लांब ओवणे, त्या साचांच्या मधोमध व गच्च राखणे, साचे गरम करणे, एकदम किंवा पाहिजे तसे थंड करणे; एकदम साचा बाहेर काढणे व बाहेर काढलेल्या मेणबत्त्या नियमित ठिकाणी गच्च पकडून ठेवणे, इत्यादि कामें यांत्रिक रीतींनी करण्याची साधने या साचाच्या पेटीत करून ठेवलेली असतात. मालक अशा प्रकारच्या यंत्राची कल्पना प्रथम अमेरिकन लोकांनी काढली होती. तिच्यांत जरुरी पुरती सुधारणा करून इंग्रज लोकांनीही असे साचे बनविले आहेत.मि. कावलीज यांणी अशा पेट्या इंग्लंडांतही तयार केल्या आहेत. आकृती नं. ७ चें चित्र पहा-हीं या प्रकारच्या पेटीचा नमुना दाखविला आहे. तिचे आ. नं. ७ लाय वर्णन 24 Lal ששששששששששששששששששששששששששש