पान:मेणबत्त्या.pdf/240

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रुंदी इतकी ठेवावी. ह्मणजे या कलथ्याने त्या पैटीतील साचांच्या उघड्या तोंडाभोवतालचे, घट्ट झालेले द्रव्य खरवडून काढण्याचे काम एकदम . व जलदी होऊ शकते. या ६ चाकू-साचांत मेणबत्त्या घट्ट झाल्यावर बाहेर काढते वेळेस तारेच्या चौकटीस किंवा सळईस बांधलेल्या वाती कापण्यास चांगल्या धारेचा एक चाकू किंवा सुरी तयार ठेवावी. ७ लोखंडी टोपल्या-घट्ट झालेले मेण पेटीतून खरवडून काढत्यानंतर ते ठेवण्यास लोखंडी टोपल्या तीन चार लागतात, त्या तयार ठेवाव्या यांसही आंतून कल्हई असावी. ८ रुमाल-काम करतांना हात व इतर सामान पुसण्यास खादीचे रुमाल तीन चार जवळ ठेवावे. ९ शेगडी-पेटीखाली आलेले साचे गरम करण्यास विस्तव लागतो.. तो ठेवण्यास दोन तीन लोखंडी शेगड्या तयार करून ठेवाव्या. या प्रमाणे हातसाचांची पेटी व तिचे इतर सामान असते. अशा पेट्या तीन चार तयार करून त्या मेणबत्त्या ओतण्याच्या खोलीत व्यवस्थित मांडून ठेवाव्या. । ओतीव मेणबत्त्या करण्याचे अगदी साधारण यंत्र झटले झणजे वर सांगितलेली हातसाचांची पेटी होय. या पेटीचा उपयोग लहान कारखानदार फार करतात. अशा हातसाचांत पाडलेल्या मेणबत्त्या कित्येक गिन्हाइकांस फार आवडतात. कधी विशेष प्रकारचा आकार व देखावा देऊन विशेष प्रकारच्या मेणबत्त्या बनवाव्या लागतात. या दोन कामी अशा लहान पेट्यांचा उपयोग करावा लागतो. विशेष प्रकारच्या मेणबत्त्या ओतण्यास त्या त्या प्रकारचे साचे तयार करून पेटींत लागू करून ठेवावे. २ मोठ्या साचाची पेटी-प्रकार १-यांत तयार होणाऱ्या मेणबत्त्यांस पुढची कळीदार बोंडे करण्याचे साधन नसतें.HTRA