पान:मेणबत्त्या.pdf/239

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२११ खाली लोंबत रहातात अशी व्यवस्था असते. पेटीची उंची ह्मणजे खोली सुमारे तीन इंच असावी. याप्रमाणे सर्व साचे पेटीच्या तळाच्या लांकडांत बसवावे ह्मणजे ते त्या पेटीखाली येतात व त्यांची उघडी तोंडे पेटीच्या तळाच्या आतील भागावर एका सपाटींत उघडी रहातात. ह्याच उघड्या व तीन इंच खोलीच्या पेटीत, पातळ द्रव्य ओतावयाचे असते. साचासह पाहिजे तितक्या पेट्या तयार करून ठेवाव्या. ३ हक--दरेक साचाच्या कळीदार व खालच्या शेवटाखाली लाकडी किंवा लोखंडी एकेक हूक लागू करून ठेवावा. या हुकास वात बांधून ती कळीदार शेवटाच्या छिद्रांतून व साच्यांतून पेटीत न्यावी लागते. जितके साचे तितके हूक तयार करून साचाखाली बरोबर लागू करून ठेवावे. ४ तारेची चौकट-साचांत वात ओवून वर काढल्यावर तेथे ती साचाच्या मधोमध व गच्च राहील अशी बांधून ठेवावी लागते. यास्तव दरेक साचाच्या वरच्या भागी झणजे पेटीच्या काठावर लोखंडी तारेची चौकट + अशा आकाराची लागू करावी लागते. कोणी चौकटीऐवजी, साचाच्या तोंडांच्या दरेक ओळीवर व पेटीच्या काठावर, आडवी लोखंडी सळई लागू करतात व या सळईसच साचांतील निघालेल्या वाती गच्च बांधून ठेवतात. चौकटी केल्या तरी त्या ठेवण्यास लाकडी । पट्ट्या लागतातच. सबब लोखंडी सळईच जास्त सोइस्कर असते. सांचाच्या जितक्या ओळी असतील तितक्या सळ्या करून त्या पेटीच्या काठावर गच्च लागू करून ठेवाव्या. ५ कलथे-पेटीतील द्रव्य घट्ट झाल्यानंतर ते खरवडून काढण्यास लोखंडी कलथा लागतो. या कलथ्यास कल्हई केलेली असते. एका पेटीत साचांच्या जितक्या ओळी असतील तितक्या खाचण्या दरेक कलथ्याच्या पानावर असाव्या. दरेक खाचणीची रुंदी, साचाच्या व्यासापेक्षां पाव इंच जास्त ठेवावी., दरेक कलथ्याच्या पानाची रुंदी पेटीच्या