पान:मेणबत्त्या.pdf/238

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

साचांची पेटी; व प्रकार ३ यांत मेणबत्त्यास पुढची कळीदार बोंडे तयार करण्याचे साधन असते. या तिन्ही प्रकारच्या पेट्यांचे व त्यांस लागणा-या इतर सामानाचे वर्णन खाली दिले आहे. २ हातसाचांची पेटी-हिच्यांत पुढे लिहिलेले सामान असते. १साचे-मेणबत्तीचे पातळ द्रव्य ज्यांत ओतावे लागते त्या पोकळ टिनच्या नळ्यास मेणबत्तीचे साचे असे म्हणतात. ही नळी टिलच्या पत्र्याची केलेली असते. ह्या नळीची लांबी व आंतील व्यास, तयार होणाऱ्या मेणबत्तीच्या लांबी व व्यासाइतका असतो. या नळीच्या वरच्या तोंडापेक्षा खालचे तोंड लहान असते. ह्मणजे नळीच्या खालच्या नागाच्या व्यासापेक्षा वरच्या भागाचा व्यास अधिक असतो. दरेक खेटीत अशा नळ्या १२-३६ पर्यंत ठेवतात. दरेक ओळीत ९-१२ जळ्या ठेवल्या तर एका पेटीत अशा नळ्यांच्या ३.४ ओळी रहातात. या नळीचा खालचा भाग निमुळता गोल ठेवून शेवटी त्यास एक सहान छिद्र, वात वण्यास ठेवलेले असते. मेणबत्तीच्या आकाराप्रमाणे, साचेही कमी जास्त लांबीचे व कमी जास्त व्यासाचे बनवून व्याच्या संख्येप्रमाणे साचेही तितके तयार करून ठेवावे. या नळ्यास आंतून कल्हई करून त्यांची आतील बाजू उत्तम पालीश-साफ केलेली असावी. २ पेटी-वर सांगितलेले साचे ठेवण्यास एक पेटी लागते. तीच ही पेटी होय. ही पेटी ६ बाजवांची असते. चोहोंकडच्या चार बाजवा व तळची एक बाजू अशा ५ बाजवा असतात. वरचा भाग खुल्ला असतो. ही पेटी लाकडाची असते. पेटीच्या तळाच्या भागास भोक पाडून त्यांत साचे गच्च लागू करावे. पेटोत पातळ द्रव्य ओतल असतां तें साचांतच जाईल व त्या पेटीबाहेर बिलकूल जाणार नाही, असे ते साचे त्या पेटीत गन्च लागू करावे. पेटीच्या तळाच्या व आंताल भागावर साचांची उघडी तोंडे येतात व साचाची कळीदार शेवटें पटा