पान:मेणबत्त्या.pdf/237

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२०९ वर्णन मागें ज्या त्या रीतीच्या वर्णनांत दिलेच अहे. सबब आतां फक्त मेणबत्त्यांचे घट्ट द्रव्य पातळ करून, वाती ठेवलेल्या सांचांत ओतून, मेणबत्त्यास आकार देण्याचे काम करणे आहे. या कामास लागणाऱ्या साचांची व तत्संबंधी इतर सामानांची माहिती देणे आहे. ती खाली लिहिल्याप्रमाणे आहे. मेणबत्त्यांचे पातळ द्रव्य ज्यांत ओततात, त्या नळ्या टिनच्या पत्र्याच्या गोल व मध्ये पोकळ अशा केलेल्या असतात. या नळ्यांसच मेणबत्त्या ओतण्याचे साचे असें नांव आहे. असे साचे २०-१२४ पर्यंत एका पेटीत, तीनपासून चार ओळींत लागू करतात. या पेटीस साचाची पेटी असे म्हणतात. या पेटीतील पोकळ साचांत वाती ठेवून ते गरम केल्यानंतर त्यांत पातळ द्रव्य ओतावे लागते. नंतर त्या साच्यासभोंवती त्या पेटीत पाणी सोडून कमी जास्त वेळांत, ते पातळ द्रव्य थंड करून घट्ट करावे लागते, सबब या कामी साचे, दट्टे, पेट्या, गरम व थंड पाण्याचे नळ, साचांत वाती ओवण्याची व साच्याबाहेर मेणबत्त्या कादन उंच पकडून ठेवण्याची सोय, वगैरे निरनिराळी कामें करावी लागतात. तसेच तें दरेक काम करण्याचे साधन तयार करून जेथल्या तेथे लागू करून ठेवावे लागते. सर्व प्रकारच्या सोयी थोड्या खर्चाने एकाच पेटीत होऊ शकत नाहीत म्हणून जो तो आपल्या गरजेप्रमाणे व खर्चाच्या मगदुराप्रमाणे साचाची पेटी लहान अथवा मोठी बनवितो. लहान पेटीचे सामान कमी व मोठ्या पेटीचे सामान जास्त असते. सबब साच्यांच्या पेट्याही निरनिराळ्या साधनांनी युक्त असतात. हल्ली मेणबत्त्या ओतण्याचे कामी, साचांच्या तीन प्रकारच्या पेट्यांचा उपयोग बहुतेक ठिकाणी करतात. त्यांची नांवें--१ हातसाच्यांची पेटी, २ मोठया साच्यांची पेटी. यांपैकी प्रकार १ यांत मेणबत्त्यांस पढची कळीदार बोंडे तयार करण्याचे साधन नसते. प्रकार २ मोठया १४