पान:मेणबत्त्या.pdf/236

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

न्याच्या मध्यभागी मेणबत्त्यांची द्रव्ये तयार करण्याची जागा असावी. कोठारघर हे, कारखान्याच्या मागच्या किंवा पुढच्या लांब बाजूत असावें; व यांत चार खोल्या असाव्या. त्यापैकी पहिल्या खोलीत कच्चा माल ठेवावा; दुसऱ्या खोलीत शिलकी हत्त्यारे वगैरे सामान ठेवावें; तिसऱ्या खोलीत अर्धकच्चा माल ह्मणजे तयार झालेली मेणबत्त्यांची द्रव्ये ठेवावीं; व चौथ्या खोलीत तयार झालेला पक्का माल झणजे मेणबत्त्या भरलेल्या पेट्या ठेवाव्या. कोठाराच्या तिसऱ्या खोलीसमोर व कारखान्याच्या दुसज्या बाजूस आणि बायलर व हौद यांच्या जवळच, मेगबत्त्यांचे द्रव्य पातळ करण्याची खोली, नंबर ५, ही असावी. हिच्या शेजारीच मेणबत्त्या ओतण्याचे काम करण्याची खोली नंबर ६ ही असावी. हिच्या शेजारी व कोठाराच्या चौथ्या खोलीजवळच, मेणबत्त्या प्याक करण्याची खोली नंबर ७ ची असावी. बाकी राहिलेल्या जागेत हिशेबी काम करण्याची खोली नंबर ८ ची असावी. तात्पर्य, कारखान्याच्या एका बाजूत कोठाराच्या चार खोल्या, व दुसऱ्या बाजूत मेणबत्यांचे द्रव्य पातळ करण्याची, त्यांचे ओतकाम करण्याची व त्या प्याक करण्याची अशा तीन खोल्या ठेवाव्या. याप्रमाणे एका लहानशा कारखान्यांत निरनिराळ्या आठ खोल्या असाव्या. जेथें एक दोन द्रव्येच तयार करून मेणबत्त्या बनविणे असतील तेथे एवढी जागा पुरी होते. पण जेथें दोहोंपेक्षा जास्त द्रव्ये बनवून त्यांच्या मेणबत्त्या बनविणे आहेत, त्या कारखान्यास वर लिहिल्यापेक्षा जास्त जागा लागते. व्यवस्थेचा क्रम मात्र वरप्रमाणेच असावा हे ध्यानात ठेवावे. याप्रमाणे मेणबत्त्यांच्या कारखान्याची मांडणी व आंतील खोल्यांची व्यवस्था ठेवावी. काम २रें-मेणबत्त्या ओतण्याचे सांचे व त्यांचे इतर सामानमेणबत्त्यांचे मूळ घट्ट द्रव्य तयार करण्याचे सामान ज्या त्या मूळ द्रव्या. प्रमाणे व बनविण्याच्या रीतीप्रमाणे निरनिराळे असते. त्या सवीचे