पान:मेणबत्त्या.pdf/235

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२०७ विणा-या कढयांतून निघणारी वाफ ही सर्व त्या कारखान्यांच्या बाहेर जाईल अशा प्रकारची विस्तृत, व्यवस्थित व हवाशीर (उघडी) जागा या कामास लागते. एकंदर सोयींच्या मानाप्रमाणे द्रव्य तयार करतांना तें शिजविण्यास लागणारी जागा कारखान्याच्या मध्यभागी असावी. हिच्या एकाबाजूस वाफ तयार करण्याचे बायलर व उंच जागेवर थंड पाण्याचे हौद असावे. या बायलरास व हौदास नळ्या जोडून सर्व कारखान्यांत पाहिजे तेथे नेऊन सोडाव्या. सांडपाणी कारखान्याबाहेर सोडण्यास एक मोठे गटर करून त्यांत बाकीची लहान लहान गटरें सोडावी. या मधल्या व खुल्या जागेत प्याराफीन मेण व स्निग्ध आसिडे तयार करण्याची यंत्रे, भघ्या, कढया, प्रेस, नळिकायंत्रे वगैरे सामान व्यवस्थित व ज्या त्या कामास निरनिराळे असें मांडून ठेवण्यास योग्य जागा तयार करून ठेवाव्या. कारखान्याच्या मागल्या किंवा पुढल्या एका बाजूस चार खोल्यांचे कोठारघर असावें. मात्र हे कोठारघर बॉयलर व पाण्याचे हौद यांच्यापासून थोडे दूर असावें. कोठारघराच्या तिसऱ्या खोलीजवळ व द्रव्य तयार करण्याच्या मधल्या जागेजवळच, मेणबत्त्यांचे द्रव्य पातळ करण्याची जागा असावी. हिच्या शेजारीच मेणबत्त्यांचे ओतकाम करण्याची जागा असावी. कोणी द्रव्य पातळ करणे व मेणबत्त्या ओतणे ही दोन्ही कामें एकाच खोलीत करतात. पण अगदी लहान कारखान्यांत अशी एकत्र काम करण्याची व्यवस्था चालू शकते. जेथे दोन तीन चार द्रव्यांच्या मेणबत्त्या बनविण्याचे काम करणे आहे, तेथें द्रव्ये पातळ करण्याची जागा निराळी व ती ओतण्याची जागा निराळी करावी लागते. तयार झालेल्या मेणबत्त्या प्याक करण्याची जागा, ओतकाम करण्याच्या खोलीशेजारी व कोठाराच्या चौथ्या खोलीशेजारी असावी. सर्व कारखान्यांत मधल्या जागेशिवाय निदान आठ खोल्या तरी असाव्या. त्यांचा क्रम:-कारखा