पान:मेणबत्त्या.pdf/234

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकार ३ रा. मेणबत्त्यांचे द्रव्य पातळ करून, वाती ठेवलेल्या साचांत ओतून मेणबत्त्या बनविणे. हल्ली इंग्लंड देशांत याच प्रकाराने बहुतेक मेणबत्त्या बनवितात. वाती ठेवलेल्या साचांत मेणबत्त्यांचे पातळ द्रव्य ओतून ज्या मेणबत्त्या तयार करतात त्या दिसण्यांत गुळगुळीत सुरेख दिसतात. त्या मुळे लोकांस त्या फार आवडतात. या प्रकाराने मेणबत्त्या ओततांना खाली लिहिलेली कामे करण्यास त्यासंबंधी सामान तयार करावे लागते. त्याची माहिती खाली दिली आहे. १ मेणबत्त्यांच्या कारखान्याची जागा. २ मेणबत्त्या ओतण्याचे साचे व त्यांचे इतर सामान. ३ द्रव्य पातळ करण्याची भांडी व तें गरम करण्यांत उष्णतेची योजना. ४ साचांत वाती ठेवण्याची व्यवस्था. ५ मेणबत्त्या बनविण्याची द्रवें व त्यांची मिश्रणे. ६ मेणबत्त्या बनविण्याचे ओतकामकरण्याची माहिती. ७ प्याकिंग ह्मणजे मेणबत्त्या विक्रीस ठेवण्यालायक स्थितीत बांधून ठेवणे. ८ मेणबत्त्यांच्या जाती.. ९ या संबंधी इतर माहिती. इतक्या गोष्टींची माहिती असावी लागते व इतकें सामान तयार करावे लागते. हे सर्व वर्णन खाली दिले आहे... १ जागा-मेणबत्त्यांच्या कारखान्याची जागा सुव्यवस्थित बांधणे हे एक मोट्या महत्त्वाचे काम आहे. जागा सोईवार असल्याने पुढील सर्व कामे सुरळीत व लवकर होऊ शकतात. जेथें मेणबत्त्यांचे द्रव्य शिजवून तयार करतात ती जागा फार खुली व हवाशीर असावी. जागा हवाशीर नसली तर द्रव्य शिजवितांना उत्पन्न होणारी वाफ, त्या कारखान्याच्या इतर भागास लागते. त्यामुळे ते भाग खराब होतात. जागेच्या छपरावर लागलेली वाफ थंड झाल्यावर तेथून पाण्याचे बारीक थैब कारखान्यांतील मालावर पडून तो माल खराब होतो. यास्तव शिज.