पान:मेणबत्त्या.pdf/233

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२०५ याप्रमाणे पहिल्या साचावरील वातीचे ओतकाम पुरे झाले झणजे दुसऱ्या, व त्यानंतर तिसऱ्या साचावरील वातींवर पातळ मेण ओतण्याचे काम करीत जावें. ४ थे काम-मेणबत्त्याबरोबर बनविणे-वरील मेणबत्या इच्छित जाडीच्या पण अनियमित लांबीच्या व अणीदार शेवटाशिवायच्या नळ्यासारख्या लांब तयार झाल्या. सबब इच्छित लांबीच्या मेणबत्त्या त्यांतून कापून काढाव्या. नंतर दरेकीचे एक शेवट एका लाकडी तुकड्याने दाबून किंवा चाकूनें खरवडून अणीदार करावे. नंतर त्या कागदांत गुंडाळून पुडकी बांधावी. याप्रमाणे मेणाच्या लहान मेणबत्त्या तयार कराव्या. २री रीत-मेणाच्या फार मोठ्या मेणबत्या तयार करणें-यांस वाती ही फार जाड तयार कराव्या लागतात. वातीचे प्रमाण मागें सांगितलें आहे ते पहावें. अशा जाड वाती मेणाच्या तुकड्यावर ठेवून त्यावर दसरे तुकडे ठेवावे. नंतर ते दोन्ही तुकडे दाबून साधारण गोल आकार द्यावा. नंतर ही अर्धवट गोल मेणबत्ती, ओलसर व गुळगुळीत दगडावर, फिरवून ( लाटून ) सारखी करावी. इच्छित जाडीची मेणबत्ती होईपर्यंत पहिल्या थरावर, मेणाचे गरम व पातळ दुसरे तुकडे ठेवून, दाबून दगडावर लटून गोल व साफ करावी. - याप्रमाणे पाहिजे तितक्या मेणबत्त्या तयार कराव्या. नंतर प्रत्येकीचे एक शेवट चाकूनें खरवडून किंवा साचांत दाबून तिचे पुढचे बोंड अथवा कळी तयार करावी. याप्रमाणे मेणाच्या मोठ्या मेणबत्त्या तयार करतात. या मेणबत्तींत मेगाचे निरनिराळे थर एकावर एक बसले असतात. त्यामुळे झाडाच्या आकृतीसारख्या रेषा तिच्या गोल भागांत दिसू लागतात.