पान:मेणबत्त्या.pdf/232

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२०४ त्याचप्रमाणे तो आकडा किंवा चौकटही मागे पुढे व अलीकडे फिरवीत जावी व वातीही पीळ दिल्यासारख्या फिरवीत जाव्या आणि उजव्या हाताने पातळ मेण ओतण्याचे काम सुरू ठेवावे. मेणबत्तीची जाडी, इच्छित आकाराच्या एक त्रितीयांश होईपर्यंत मेण ओतण्याचे पहिले काम सुरू ठेवावे. नंतर दोन आकड्यावरील किंवा चौकटीवरील मेणबत्त्या एक त्रितीयांश जाडीच्या झाल्यानंतर ते आंकडे किंवा चौकटी त्या तुळईवरून उचलून दुस-या एका खांबावर उभ्या ठेवाव्या. येथे त्या वातीवरील मेण सुकू द्यावे. नंतर दुसरे साचे तुळईवर लागू करून त्यावर वाती गुंडाळून त्यावर पातळ मेण ओतण्याचे काम सुरू करावें. पहिल्या खेपेस मेण ओतलेल्या वाती सुकल्या ह्मणजे ते साचे पुनः तुळईवर लागू करून, त्या वातीवर पातळ मेण पुनः हळू हळू वर प्रमाणेच ओतावे. मेणबत्तीची जाडी, इच्छित आकाराच्या अर्ध्या इतकी होईपर्यंत हे दुसऱ्या खेपेने पातळ मेण ओतण्याचे काम सुरू ठेवून नंतर बंद करावें. नंतर ते साचे तुळईवरून काटून घेऊन त्या मेणबत्या गरम आहेत तोच, एका गुळगुळीत पांढया दगडावर ती दरेक फिरवून (लाटून) साफ करावी. हा दगड एका ओल्या फडक्याच्या किंवा कागदाच्या ओल्या रुळाने प्रथम ओलसर करावा, नंतर त्यावर त्या ऊन मेणबत्त्या फिरवून सारख्या कराव्या. याप्रमाणे त्या साचावरील सर्व मेणबत्त्या साफ केल्यानंतर तो साचा उलट फिरवून त्या तुळईवर लागू करावा. नंतर पुनः त्या अर्धवट मेणबत्त्यावर पातळ मेण ओतण्याचे काम सुरू करावें. मेणबत्त्यांची जाडी इच्छित आकाराची होईपर्यंत हे तिसऱ्याने पातळ मेण ओतण्याचे काम सुरू ठेवावे. इच्छित जाडीच्या मेणबत्त्या तयार झाल्यावर, त्या ऊन आहेत तोच पुनः वर सांगितल्याप्रमाणे दगडावर फिरवून फिरवून साफ व गुळगुळीत कराव्या व तो साचा एका खांबावर ठेवून द्यावा.