पान:मेणबत्त्या.pdf/231

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२०३ न्यावा. ह्मणजे आकड्याच्या मागल्या बाजूस धनुष्यासारखी दोरी लावल्याप्रमाणे ती वात दिसेल. नंतर ती वात आंकड्यांच्या पुढच्याभागी आणून तशीच दुसरीकडे न्यावी. ह्मणजे पहिल्या वातीस समांतर अशी राहील, व दोन वातीच्या थरामध्ये आकड्याची जाडी येईल. याप्रमाणे दरेक आकड्याच्या मागून पुढे व पुढून मागे अशी ती सबंद वात वरून खालपर्यत ( खिळ्याच्या बाजूपर्यंत ) गुंडाळावी. व शेवटी तीस गच्च गाठ द्यावी. आकड्याच्या जाडीने वातीचे दोन थर ( मागला व पुढला ) असे तयार होतात. सर्वात वरचा थर जास्त लांब असून त्यापेक्षा त्या खालचा दरेक थर कमी कमी लांब असा रहातो. याप्रमाणे दोन्ही आकड्यावर वाती गुंडाळाव्या. प्रत्येक बाजूवरील दोन वातीमध्ये असणारे अंतर मेणबत्तीच्या इच्छित जाडीपेक्षां पाऊण इंच अधिक ठेवावे. दोन बाजूच्या वातीमधील अंतर त्या आकड्याच्या जाडीप्रमाणे राहते. - लोखंडी चौकटी असल्यास तुळईच्या लांबीप्रमाणे त्यावर वाती मागून पुढे व पुढून मागें गुंडाळाव्या व शेवटी गाठ देऊन ठेवावी. वाती गच्च रहाण्यास्तव आकड्यावर किंवा चौकटीवर बारीक खाचण्या पाडाव्या. ह्या खाचण्यांतून वाती ठेवून गुंडाळल्या ह्मणजे त्या गच्च रहातील. ३रें काम- वातीवर पातळ मेण ओतणे. पान ११ वर सांगितल्याप्रमाणे स्वच्छ केलेले मधमाशांचे मेण साचाखालच्या कढईत टाकून मंद उष्णतेने पातळ करावे. नंतर ते ओतण्याचे काम करणाराने डाव्या हाताच्या मुठीत आकडा किंवा लोखंडी चौकटीची पट्टी धरून, उजव्या हाताने ते पातळ मेण पळीत घेऊन दरेक वातीवर ओतीत जावें. याप्रमाणे मागल्या बाजूच्या सर्व वातींवर व पुढच्या बाजूच्या सर्व वातीवर हळू हळू पातळ मेण ओतीत जावें. मेण ओततांना डाव्या हाताच्या बोटांनी ती दरेक वात हलकेच पीळ दिल्यासारखी फिरवीत जावी ह्मणजे त्या वातीच्या सर्व भागावर ते पातळ मेण वाहून जाऊन चिकटं शकते.