पान:मेणबत्त्या.pdf/230

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

करणे, २ .साचावर वाती गुंडाळणे, ३ वातीवर पातळ मेण ओतणे, ४ मेणबत्त्या बरोबर बनविणे. १ लें काम-वाती ठेवण्याचे साचे तयार करणे. एका आडव्या तुळईवर लोखंडी अथवा लाकडी आकडे एक किंवा दोन बसवावे. या आकड्यांचा आकार अर्धगोल (धनुष्यासारखा ) असावा. या दरेक आकड्याच्या मध्यभागास एकेक खिळा मारलेला असावा. हा खिळा त्या तुळईत बसवून त्यांत ते आंकडे तीन बाजूस फिरते राहतील असे बसवावे. दरेक आकड्याची शेवटें वरती असून दोन शेवटामधील जागा सर्वात जास्त लांब असावी. हे आकडे मागें, वर व पुढें ( आपलेकडे ) फिरवितां येतील अशी सोय केलेली असावी. मेण पातळ करण्यास एक लोखंडी कढई त्या तुळईखाली ठेवून तिच्या खाली उष्णता देण्याचे साधन लागू करावें. हे आकडे तुळईवरून सहज उचलतां येतील व तीवर पुनः सहज बसवितां येतील. अशी सोय करून ठेवावी लागते. दरेक आकड्याची जाडी सुमारे दोन इंच असावी. असे पांच सहा जोड तरी एका लहान कारखान्यांत तयार करून ठेवावे. कोणी आकडे न करता त्याऐवजी लोखंडी चौकटी करून तुळईवर बसवितात. यामुळे एकसारख्या लांबीच्या वाती त्यावर राहू शकतात. मात्र ह्या चौकटी त्या तुळईवर तिन्ही बाजूस फिरवितां येतील अशी सोय करावी. याप्रमाणे तुळईवर वाती गुंडाळण्याचे साचे लागू करावे. २ रे काम-साचावर वाती गुंडाळणे. याकामी लागणाऱ्या वाती कोणत्याही धुण्याच्या मिश्रणांत प्रथम धुतलेल्या नसाव्या. या वाती प्रथमत: उष्णतेवर गरम करून कोरड्या व गरम कराव्या. अशी लांब तयार केलेली वात घेऊन तिचा वरचा शेवट, एका आकड्याच्या वरच्या शेवटास बांधून बाकीचा भाग दुसन्या शेवटाकडेस त्याच बाजूने