पान:मेणबत्त्या.pdf/229

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२०१ काम करणारासाठी वरील साचांची व भोकांमधील अंतरें थोडी जास्त ठेवण्यास लिहिले आहे. पण एकवार काम करून अनुभव घेतल्यानंतर वर लिहिलेली अंतरें बरीच कमी करता येतील. त्यायोगे मेणबत्त्याही अधिक तयार होऊ शकतील. मुख्य मुद्दा हा आहे की, वाती उभ्या व न हालतील अशा ठेवाव्या लागतात; ही गोष्ट लक्षात ठेवून त्या सोईचे साचे ज्याने त्याने आपले इच्छेनुरूप बनवावे. व या कामी एक साच्यावर अनुभव घेतल्यानंतर इच्छित आकाराचे व सोईचे जोड अधिक बनवून ठेवावे. या प्रकाराने स्टिअरीन ( पान ४६ ) च्याही मेणबत्त्या बुचकळाव्या. दुसरा प्रकार. बातीवर पातळ द्रव्य ओतून मेणबत्त्या बनविणे. फक्त मधमाशांच्या मेणाच्या मेणबत्या, बनविण्यांत या प्रकाराने काम करावे लागते. कारण हे मेण पातळ करून साचांत ओतले तर त्या मेणबत्त्या थंड झाल्यावर साचास चिकटून रहातात किंवा साचा बाहेर काढतांना फुटतात. या दोन अडचणीमुळे मधमाशांचे मेण पातळ करून वातीवर ओतूनच अशा मेणबत्त्या करण्याचा रिवाज पडला आहे. या मेणबत्त्या ख्रिश्चन लोक देवळांत व धर्मसंबंधी कामांत फार वापरतात. सबब यापैकी कित्येक लहान व कित्येक फार मोठ्या तयार कराव्या लागतात. म्हणून या प्रकाराचे काम दोन रीतींनी करतात. १लीरीत--मेणाच्या लहान मेणबत्त्या तयार करणे. २री रीत-मेणाच्या मोठया मेणबत्त्या तयार करणे. १ ली रीत-मेणाच्या लहान मेणबत्त्या तयार करणे. या रीतीतही १ कामें करावी लागतात. ती कामे, १ वाती ठेवण्याचे साचे तयार चारसरण.