पान:मेणबत्त्या.pdf/228

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२०० खालच्या बाजूस चाकू फिरवून वातीची खालची शेवटें कापावी. ह्मणजे त्या वाती वरच्या पट्ट्यावर लोंबत राहतात. नंतर त्या वाती (अर्धवट जाडीच्या व लोंबत्या मेणबत्त्या) पुनः बचकळण्याचे काम सुरू करावें. अशा रीतीने त्या मेणबत्त्या इच्छित जाडीच्या होईपर्यंत पातळ चरबीत बुचकळून काढून सुकवीत जाव्या. शेवटील बुचकळण्याचे काम फार काळजीने करावें. शेवटचा थर एकसारखा बसला पाहिजे. कदाचित मेणबत्त्यांचा खालचा भाग फार जाडा झालासें वाटेल किंवा त्या जरा खरबरीत आहे असे वाटेल तर जास्त उष्ण मानाच्या चरबीत त्या कांहीं वेळ बुचकळून टेवाव्या; ह्मणजे जास्त असलेली चरबी पातळ होऊन निघून जाईल व राहणारा भाग साफ व एकसारखा दिसेल. या मेणबत्यांचा खालचा भाग अधिक जाड व वरचा भाग कमी जाड असा तयार होतो. तसे या मेणबत्त्यांस वात पेटविण्याच्या ठिकाणी बोंडे ( आणीदार शेवटें ) नसतात. पट्ट्यांच्या रुंदीमुळे व त्यांच्यामधील अंतरामुळे, मेणबत्त्या बुचकळतांना एकमेकांस चिकटत नाहीत. याप्रमाणे मेणबत्या पाहिजे तितक्या जाड व वजनदार झाल्या ह्मणजे सर्व साचे सुकत ठेवावे. त्या चांगल्या सुकल्यानंतर साचाच्या वरच्या पट्ट्यावरील वाती कापून एकेक मेणबत्ती काढून घ्यावी. ह्या मेणबत्त्या कागदाच्या पुडक्यांत बांधतात. दरेक पुडक्यांत ६-१२पर्यत मेणबत्त्या घालून ते बंद करावें. बहुतकरून एक पुडके एक शर ( पाउंड) वजनाचे असते. - यापेक्षा मोठ्या प्रमाणावर काम करणे असेल तर ठोकळ्यासहित वाती ठेवण्याच्या साचांचे जोड व गाळसाचांचे जोड अधिक तयार करून ठेवावे. कोणी लाकडाचे ठोकळे न वापरतां लोखंडी चौकट करून तिच्यात वाती ठवण्याचे साचे बसवून काम करतात. नवीन व बिनकाळजीन