पान:मेणबत्त्या.pdf/227

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ळून काढाव्या. या कामांत मेणबत्तीची सर्व जाडी एकदम तयार होत नाही. पहिले दोनतीन थर वातीवर बसले ह्मणजे वातीवरील पातळ द्रव्य सुकू द्यावे लागते. वातीवरील प्रथमचे द्रव्य सुकल्यानंतर त्याजवर त्या द्रव्याचा दुसरा थर बसू शकतो. सबब ते दोन्ही ठोकळे हातांनी धरून त्या आकड्यावरून उचलावे व एका गाळसाचावर ( खांबांच्या खाचणींत ) ठेवावे. झणजे त्या वातींतील पातळ चरबी गाळसाचामधील कढईत टिपकत राहील व वातीवरील पातळ चरबी हवेच्या योगाने सुकत जाईल. __नंतर दुसऱ्या.ठोकळ्यासहित चार साचांचा जोड (निराळा ) त्या आकड्यावर बसवून त्यांत वाती मागे सांगितल्याप्रमाणे बसवाव्या; व त्या वाती बुचकळण्याचे काम पुनः सुरू करावें. याप्रमाणे तिन्ही जोडावरील वाती प्रथम बुचकळ्यानंतर सुकत ठेवाव्या. या वेळेस प्रथम जोडावरील वातीची चरबी सुकलेली असते. सबब तो पहिला साच्याचा जोड ठोकळ्यासह त्या आकड्यावर बसवावा. आणि त्या सुकलेल्या चरबीच्या वाती पुन: बुचकळण्यास सुरवात करावी. या वेळेस त्या पातळ चरबीचे उष्णमान--१००-११०° फा० अंशांचे असावें, कढईच्या बाजवा जवळ ती पातळ चरबी जराशी घट्ट होऊ लागली झणजे वरचे उष्णमान सरासरी तीस प्राप्त झाले असे समजावें, पहिल्या खेपेनंतर पुढे दर वेळेस वाती बुचकळण्याची चरबी पहिल्या वेळेपेक्षा जास्त घट्ट हणजे कमी उष्णमानाची ठेवावी. या योगें पहिल्या चरबीच्या थरावर दुसऱ्या पातळ चरबीचा थर लवकर चिकटतो. याप्रमाणे दोनतीन थर देऊन ठोकळ्यासहित तो साचाचा जोड गाळ साचावर नवी चरबी सुकण्यास्तव ठेवावा. वातीवरील चर्बीचे दोन थर चांगले सुकल्यानंतर तपासावे. त्या मेणबत्या बऱ्याच कठिण व ब-याच जाड झाल्यानंतर त्या साचाचे