पान:मेणबत्त्या.pdf/226

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९८ साचांत दुसऱ्या आकड्यावर गुंडाळलेली वात बसवावी. कमी पडल्यास वातीस दुसरी वात जोडावी; मात्र जोडाच्या ठिकाणी मोठी गाठ ( पट्टी वरील भोकांत न शिरेल अशी) राहू देऊ नये. दरेक ओळीत वीस ह्मणजे दोन ओळीत चाळीस दोरे उभे व ताठ रहातात. एकंदर चार साचांत १६० दोरे ताठ व उभे राहिले झणजे वाती बसविण्याचे काम पुरे झाले. शेवटच्या भोकांतून वात बाहेर काढल्यानंतर ती हलू नये ह्मणून तेथे तिच्या शेवटास बळकट गाठ देऊन ठेवावी. आतां वाती ठेवण्याचे साचे व गाळसाचे तयार होऊन, साचावर कोरड्या वाती गुंडाळून ठेविल्या आहेत, इतके काम झाले. पुढे या वातीवर दाबलेली चरबी चढविणे आहे. ४ थे काम-वाती बुचकळणे-आकडे असणाया आडव्या तुळईच्या लांबीपेक्षां दोनतीन इंच जास्त लांबीची व ठोकळ्याच्या लांबी (२१ इंच ) पेक्षां तीन इंच जास्त रुंदीची व ठोकळ्याच्या उंचीपेक्षा चार इंच अधिक उंचीची झणजे खोलीची एक कढई तयार करावी. ही कढई लोखंडी चौरस व आंतून कल्हई ( शिशाची ) केलेली असावी. पान ४१-४६ वर सांगितल्याप्रमाणे दाबलेली चरबी किंवा लाडे सुमारे ४० शेर घेऊन त्या कढईत टाकावे. मंदोष्णता लावून ती चरबी पातळ करावी. या वेळेस तिचे उष्णमान १२०° फा. अंश असाव. तिचे इतकें उष्णमान झाले ह्मणजे. ती कढई उचलून वाती ओवलेल्या साचाखाली ठेवावी. नंतर एका हाताने त्या आडव्या तुळईवर दाब करावा ह्मणजे ती खाली सरकते व साचे त्यांजवरील वातीसह, त्या खालच्या कढईतील पातळ चरबीत बुडतात. या योगे त्या वाती पातळ चरबींत बुचकळल्या जातात. नंतर तुळईवरील हाताचा दाब काढावा ह्मणजे ती आपोआप वर सरकते व साचे ( वातीसह ) पातळ द्रव्याबाहेर येतात. याप्रमाणे दोनतीन वेळ त्या वाती पातळ चरबीत बुचक