पान:मेणबत्त्या.pdf/225

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९७ លា २ रे काम-गाळसाचे तयार करणे. वाती दोन तीन वेळ बुचकळल्यानंतर सुकत ठेवाव्या लागतात. त्या वेळेस त्यांवरील मेण खाली टिपकत असते, ते फुकट जाऊं नये ह्मणून वरील ठोकळ्याचा जोड ठेवण्यास एक लाकडी साचा करतात; यासच गाळसाचा ह्मणतात. दोन लाकडी खांब जमीनीत गच्च पुरावे. या दरेक खांबाचा जमिनीवर आलेला भाग, ठोकळ्याच्या उंचीपेक्षा दीडपट उंच असावा. दरेक खांबावर ठोकळा गच्च बसेल अशी खाचणी करावी. दोन खांबामध्ये कल्हई केलेली व उथळ अशी लोखंडी कढई ठेवावी. या दोन खांबावर ठोकळे ठेवले ह्मणजे त्या साचांतील मेणबत्त्या खांबामधील कढईवर लोंबत रहातील; आणि त्या मेणबत्त्यांतील टिपकणारे पातळ द्रव्य त्या कढईत पडेल अशी व्यवस्था करावी. असे गाळसाचे तीनपर्यंत दरेक कारख.न्यांत तयार करून ठेवावे. ३ रे काम-साचांत वाती गुंडाळणे. मागे सांगितल्याप्रमाणे तयार करून ठेवलेली व इच्छित जाडीची लांबच लांब वात लोखंडी प्रत्येक आकड्यावर गुंडाळून ठेवावी. नंतर या वातीचे वरील शेवट पहिल्या व वरच्या पट्टीच्या त्याच ( वात असणान्या ) आकड्याच्या बाजूकडील पहिल्या भोकांत ओवून खाली काढावे. नंतर ते शेवट त्याच पट्टीच्या खालच्या पट्टीवरील आणि ओवलेल्या भोकासमोरील भोकांतून काढावें. नंतर या शेवटच्या भोकाशेजारच्या. व त्याच 'ओळीतल्या भोकांतून वर काढून वरच्या पट्टीवरील प्रथम ओवलेल्या भोका शेजारच्या भोकां. तून वर काढावे. याप्रमाणे एक ओळ पुरी झाल्यानंतर त्याच पट्टी वरील दुसऱ्या ओळीत वात बसवावी. नंतर दुसरी ओळ पुरी करावी. नंतर दुसऱ्या साचावरील ओळीत याचप्रमाणे वाती बसवाव्या. या प्रमाणे चारही साचावरील १६० भोकांत वात बसवून पुरी करावी. पहिल्या दोन साचांत एका आकड्यावर गुंडाळलेली व दुसऱ्या दोन