पान:मेणबत्त्या.pdf/224

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पाडावें. दरेक ठोकळ्याच्या आतील ह्मणजे समोरासमोरचे बाजूस वरच्या भागी चार व खालच्या भागी चार खाचण्या कराव्या. या खाचण्यांत लाकडी पट्टया लागू कराव्या लागतात. खाचण्या दोन्ही ठोकळ्यावर समांतर असाव्या. वाती ठेवण्याच्या पट्टया याच खाचण्यांत बसवाव्या लागतात. नंतर या दोन ठोकळ्यांच्या वरच्या चार खाचण्यांत चार पट्टया व खालच्या चार खाचण्यांत चार पट्ट्या लागू कराव्या. कोणी ह्या पट्ट्या बाह्य गोलही तयार करून वापरतात. ही दरेक पट्टी लाकडाची असते. हिची जाडी ॥ पासून ।॥ इंच; लांबी ३६-४० इंच; व रुंदी २-३ इंच ठेवावी. दरेक पट्टीवर रुंदीच्या भागांत वात घालण्यास वीस वीस भोके पाडावी. ह्मणजे ह्या पट्टीच्या एका कांठाच्या किंचित अलीकडे वीस व दुसऱ्या काठाच्या किंचित् पलीकडे वीस अशी समोरासमोर व पट्टीच्या लांबीत चाळीस भोके पाहावी. दर ओळीतील प्रत्येक दोन भोकांमधील अंतर २-२॥ इंच असावे. याप्रमाणे आठही पट्ट्यांस भोके पाडून त्या साफ करून लांकडी दोन ठोकळ्यांत बसवाव्या. दोन्ही ठोकळ्यांच्या वरच्या चार खाचण्यांत चार पट्ट्या व खालच्या चार खाचण्यांत चार पट्ट्या बसविल्या ह्मणजे वरच्या पट्टयांवरील भोकांच्या ओळी खालच्या पट्ट्यांवरील भोकांच्या ओळीसमोर बरोबर रहातात. दोन पट्ट्यांचा एक साचा असे चार साचे दोन ठोकळ्यावर लागू करावे. ह्मणजे दरेक साचांत दरेक बाजूस २० प्रमाण दोन्ही बाजूस ४० भोके वाती ठेवण्यास तयार होतात. या चारही साचांचा आकार चार विटाळी एकत्र बसविल्यासारखा दिसतो. चार साचांत १६० वाती राहतात. हा एकत्र चार विटाळ्यांचा साचा, तुळईस अडकवलेल्या आकड्यावर लागू करावा. या साचांत वाती बसवितात. दोन टोकळ्यासहित चार साचांचा एक जोड होतो. असे तीन जोड तरी लहान कारखान्यांत तयार करून ठेवावे.