पान:मेणबत्त्या.pdf/223

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९५ बनविण्याची रीत-~या रीतीत चार निरनिराळी कामें करावी लाग तात. ती कामें-१ वाती बुचकळण्याचे सांचे तयार करणे २ गाळ साचे तयार करणे; ३ वाती गुंडळणे; व ४ वाती बुचकळणे. १ लें काम वाती बुचकळण्याचे साचे तयार करणे-आकृती नंबर ६ चे चित्र पहा. यांत एक लो खंडी तुळई आडवी ठेवआ. नं. ६ लेली आहे. या तुळईस साखळदंड किंवा दोऱ्या लावून ती खाली व वर सहज ढकलतां यावी असे साधन केलेले असते. घराच्या एका तुळवटावर एक चाक बसवून त्या चाकावरून ते साखळदंड किंवा दोन्या पलीकडे सोडतात. त्याच्या शेवटास दगडी किंवा लोखंडी एक मोठे वजन बांबतात. या योगें ती. लोंबत रहाणारी तुळई खाली दाबून सोडल्यानंतर आपोआप वर उचलली जाते या लोखंडी लोंबत्या तुळईस खाली दोन लोखंडी आंकडे बसविलेले असतात या दरेक आंकड्यावर लांकडी ठोकळा एकेक आडवा ठेवलेला असतो-ह्मणजे दोन आंकड्यावर दोन ठोकळे आडवे लागू करावे. हे ठोकळे पाहिजे तेव्हां त्या आकड्यांवरून उचलता येतील व त्यांवर बसविता येतील असे तयार करावे. दरेक ठोकळा २१ इंच लांब ३ इंच जाड व सर्वात लांब मेणबत्तीच्या लांबी पेक्षा २॥ इंच अधिक इतका उंच असा असावा. लोखंडी आंकड्याच्या शेवटावर दरेक ठोकला लागू करता येईल असे त्या ठोकळ्याच्या मागल्या बाजूस एकेक भोंक