पान:मेणबत्त्या.pdf/222

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९४ माहिती सांगितली. आता हे दोन पदार्थ एकत्र करून मेणबत्ती कशी बनवावी ती माहिती देतो. मेणबत्त्यांचे घट्ट द्रव्य व वाती एकत्र ठेवून मेणबत्त्या बनविण्याचे काम ४ प्रकारांनी करतात. ते प्रकार-१ पातळ केलेल्या चरबीत वाती बुचकळून मेणबत्त्या तयार करणे; २ पातळ केलेले द्रव्य वातीवर ओतून मेणबत्त्या तयार करणे; ३ घट्ट द्रव्य पातळ केल्यानंतर वाती ठेवलेल्या साचांत ओतून मेणबत्त्या तयार करणे; ४ नाईट लाईटस झणजे लहान मेणबत्त्या . ( लांबणदिव्याच्या किंवा पणतीच्या ऐवजी वापरतात त्या ) तयार करणे. यांस हात दिवे हे नांव दिले आहे. पहिल्या प्रकाराने केलेल्या मेणबत्त्यास डीप क्यान्डलस (Dip candles) ह्मणजे बुचकळलेल्या मेणबत्त्या ह्मणतात. दुसऱ्या प्रकाराने केलेल्यांस पोअर्ड क्यान्डलस ह्मणजे मेणाच्या मेणबत्त्या ह्मणतात. तिसऱ्या प्रकाराने केलेल्यांस ओतीव किंवा मिश्र मेणबत्त्या ( Moulded or Composite candles ) ह्मणतात. आणि चवथ्या प्रकाराने केलेल्यास रात्रदिवे ( Night lights ) किंवा हात दिवे ह्मणतात, १ ला प्रकार-बुचकळलेल्या मेणबत्त्या तयार करणे-मागे लिहिल्या प्रमाणे चरबी किंवा लार्ड यांत्रिक रीतीने दाबून घट्ट केलेले असतात. त्यांचा उपयोग या कामी करतात. इंग्लंड देशांत घरगुती बारीक सारीक कामांत, घरगुती नौकर लोकांत, खाणीत, झोपड्यांत हानाला लोकांत आणि लहान कारखान्यांत या प्रकारच्या मेणबत्त्या nार पापरल्या जातात व त्यांच्या वातीस काजळी फार येते.