पान:मेणबत्त्या.pdf/221

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९३ मंतर एका कल्हई केलेल्या लोखंडी पेटीत त्या वाती ठेवाव्या. या पेटीस वाफेची उष्णता देऊन तेथे त्या चांगल्या सुकवाव्या. नंतर कोठारांत ठेवाव्या. जेव्हां वात जळतांना फारच खाली वांकते व त्यामुळे मेणबत्तींत पडलेल्या मेगाच्या प्यालाचा एक कांठ विरघळून मेण खाली वहात जाते तेव्हां वात भिजविलेल्या मिश्रणांत मूळ द्रव्ये थोडी पडली आहेत असे समजावें. सबब पुनः काम करतांना ती द्रव्ये मिश्रणांत जास्त मिळवून नंतर त्यांत वाती भिजवाव्या. ____तसेंच मेणबत्ती विझल्यानंतर त्या वातीस जी ठिणगी रहाते ती ठिणगी धुसमुसत थेट मेणापर्यंत जळत जाते. या योगे ती वात फारच आखूड झाल्याने पुनः प्रज्वलित करण्यास फार त्रास पडतो. आणि ठिणगी पुरती न विझाल्याने तिच्यातून बराच धूर निघत असतो. असें झाले तर त्या वातीत मोठा दोष राहिला असे समजावें. तो घालविण्यास नंबर ४ च्या मिश्रणांत वाती दोन तास भिजवाव्या. याप्रमाणे दोन चार अनुभव घेऊन पसंत ठरेल त्या मिश्रणांत वाती भिजवून चांगल्या सुकवून ठेवाव्या. भाग ७ मेणबत्त्या बनविणे. येथपर्यंत मेणबत्त्यांचे घट्ट द्रव्य निरनिराळ्या स्निग्ध पदार्थांपासून कसे बनवावे व त्यांच्या वाती कशाच्या व कशा तयार कराव्या इतकी