पान:मेणबत्त्या.pdf/219

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९१ (ज्वालेच्या आंतील ) भाग तिच्या बाहेरच्या गरम हवे. फारसा उडून जात नाही आणि राखही वातीच्या शेवटी उत्पन्न होते. यास्तव तो जळणारा वातीचा शेवट ज्वालेच्या बाहेर व खाली थोडा तरी वाकडा रहावा अशी स्थिति त्या वातीस आणावी. ह्मणजे त्या बाहेर व खाली वाकलेल्या शेवटाची राख होते, व त्या राखेचा बहुतेक भाग खालून येणाऱ्या गरम हवेने वर उडून जातो. यामुळे ती सर्व वात जळाल्यानंतर अगदी थोडी राख प्याल्यांत शिल्लक पडलेली दिसते. यासच राख अगदी कमी उत्पन्न होणे असें ह्मणतात. हाही गुण पुढे लिहिलेल्या एका रसायनिक मिश्रणांत ती वात भिजविल्याने तिच्यांत येतो. 'फार जोराने जर वात ताणली असेल किंवा तिच्या पदरांस जास्त पीळ दिला असेल तर ती जळतांना तिचा शेवट वाकडा होत नाही व खाली वाकत नाही. पण 'वातीचा आकार' या शब्दाखाली लिहिलेल्या कृतीप्रमाणे तिच्या पदरांस बेताचा पीळ व विणीस बेताचा ताण व दाब देऊन वात विणली असतां तिचा शेवट जळतांना वाकडा व खाली राहू शकतो. ही यांत्रिक क्रिया आहे. सबब हिजवर जास्त भरंवसा ठेवीत नाहीत. ह्मणून रसायानक मिश्रणांत वात भिजविल्याने, इतर गुणांसह मुख्य गुण जो राख कमी उत्पन्न होणे, तो तिच्यांत सहज येऊ शकतो. यास्तव वाती विणून स्वच्छ केल्यानंतर पुढील एखाद्या रसायनिक मिश्रणांत भिजवाव्या. मेणबत्त्यांच्या वाती भिजविण्याची रसायनिक मिश्रणे. बोरसीक आसीड शेर १ गोडे पाणी , ९३॥ है मिश्रण फार लोक वापरतात. बोरेसीक आसीड तोळा ॥1॥ गाडे पाणी , ८५ यांचे मिश्रण करून नंतर त्यांत सल फ्युकररीक आसीड तोळा ॥ मिळवावे.