पान:मेणबत्त्या.pdf/218

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९० सून कानाशी नेऊन हाताच्या बोटांनी घासलें तर करकर आवाज ऐकू येतो. असें ठरलें म्हणजे ती वात कोरडी आहे, असे समजावें. ४ वात पूर्णपणे जळणें-यांत तिच्या ज्वालेच्या खालच्या जागी जो वातीचा भाग असतो, त्याचे बाहेरील आंग मात्र तेथेंच जळावे व त्याचे आंतील अंग फारसें तेथें न जळतां वरवर चढत व जळत जळत जाऊन शेवटी पूर्ण जळले पाहिजे. असे झाले म्हणजे वात पूर्णपणे जळली असें म्हणतात. असे करण्यास तिच्या ज्वलन क्रियेस थोडा तरी प्रतिबंध करावा लागतो. म्हणजे ती हळूहळ जळत जाते. . यामुळे बाहेरील भागास जास्त उष्णता लागल्याने तो जसजसा जळत जातो तसतसा वरवर चढून जळत जातो. हा गुण वातीत आणण्यास पुढे लिहिलेल्या एका रसायनिक मिश्रणांत ती वात भिजवून काढावी. ५ वात जळाल्यानंतर राख कमी उत्पन्न होणे हा गुण वातीत आणण्यास तिचा शेवट जळतांना थोडा तरी ज्वालेच्या बाहेर व खाली वाकावा अशी शक्ति त्यांत आणावी लागते. आतां पदार्थ जळल्यानंतर त्यापासून राख उत्पन्न होणे हा जो स्वाभाविक धर्म तो, वात ज्या पदार्थाची केलेली असते त्यांतही असतोच. ह्मणजे शेवटी राख मुळीच उत्पन्न होणार नाही, असे कोणत्याही उपायाने करता येणे शक्य नाही. ह्मणून उत्पन्न झालेली राख तेथून उडविली असता, तिचे प्रमाण तेथें कमी राहील एवढाच प्रयत्न करावयाचा असतो. ज्वलन किया चालू असतां ज्बालेत व तिच्या आजुबाजूस उष्णता उत्पन्न होतेच. या उष्णतेने तिच्या आजुबाजूची हवा गरम होऊन वर जाते. या गरम हवेच्या वर जाणाऱ्या प्रवाहांत येणारे हलके द्रव्य सहज उडून वर जाते. ज्वालेंतील वातीचा शेवट जळत असतो. सबब त्यांत -पातळ स्निग्ध द्रव्य असल्याने तो जड असतो. ह्मणून बातीचा तो