पान:मेणबत्त्या.pdf/217

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३ वात एकसारखी जळणें-१. ज्वालेच्या खालच्या भागांतील वातीचे बाहेरचेच आंग तेवढे जळावे व तेथे तिचे आंतील आंग (भाग) पूर्ण न जळतां वरवर चढत जाऊन जळत जावें; २ वात जळतांना तडतड आवाज होऊ नये; व ३ ज्वालेंतून ठिणग्याही निर्धू नयेत. अशा तीन गुणांनी वातीचे ज्वलन होण्यास ती एकसारखी जळणे असे म्हणतात. १ ला गुण तिच्यांत आणण्यास पुढे लिहिलेल्या मिश्रणांपैकी एकांत ती वात भिजवून काढावी लागते. २ व ३ हे दोन्ही गुण ( न तडतडणे व ठिणग्या न निघणे) जळतांना ती ओली असल्यास नाहीसे होतात. सबब ओलेपणाचा दोष काढून टाकून वात कोरडी ठेवण्याची माहिती सांगतो. दोन प्रकारांनी वात ओली राई शकते. एक ती स्वच्छ केल्यावर एकाद्या रसायनिक मिश्रणांत भिजवन काढावी लागते. त्या वेळेस ती पिळून काढून साफ वाळविली नसतांच मेणबत्तींत घातली तर ओली रहाते. दुसरा प्रकार-मिश्र मेणबत्त्यांच्या साच्याबाहेर असलेले पाणी जास्त झाल्याने वातीचें एक शेवट जरी त्या पाण्याने भिजलें तरी बहुतेक वात ओली होत असते. व पुढे ती सुकण्यास फारसा अवकाश किंवा साधन मिळत नाही. अशा प्रकारांची ओलीवात असली तर ती जळताना तडतड आवाज होतो; तिच्यांतून ठिगग्या निघतात; तिची शोषकशक्ती कमी होते, त्यामुळे ज्वलनक्रिया मंद होते; म्हणून पातळ झालेले स्निग्ध द्रव्य पुरें जळत नाही; व या सर्व कारणांमुळे त्या ज्वालेचा प्रकाश मंद पडतो. यास्तव कोणत्याही प्रकाराने काम केले तरी काळजीपूर्वक ती वात चांगली सुकवावी. ओली राहू देऊ नये. वात कोरडी असल्याचे लक्षण वात हातावर घांसली असतां ती कोरडी आहे की नाही ते समजते. किंवा तिचे दोन तीन पदर क