पान:मेणबत्त्या.pdf/216

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८८ वाती धुण्याचे मिश्रण. ' लायकर आमोनिया तोळे. १७) याप्रमाणे मिश्रण तयार करपाणी गोडें. ६१५ तांना त्यास थोडासा ऊत येतो. सलफ्युरीक आसीड. २॥ तो ऊत बंद झाल्यावर त्यांत साफ करावयाच्या वाती टाकून ते सर्व मिश्रण वाफेनें दीड तास उकळावे. नंतर त्यांतून वाती काढून घेऊन दुसऱ्या भांड्यांत टाकाव्या; व त्यांत १००० तोळे ( २५ शेर ) शुद्ध गोडे पाणी मिळवून पुनः अर्धा तास उकळाव्या. नंतर त्यांतून काढून घेऊन पुनः दुसऱ्या गोड्या व थंड पाण्यांत खळबळून धुवाव्या. नंतर बाहेर काढून जोराने पिळून त्यांतील शेष पाणी काढून टाकावे. नंतर त्या सुकवाव्या. म्हणजे त्यांतील मळ वगैरे गेल्याने त्यांत शोषक शक्ती जास्त येते. । ३ वातीची ज्वलन क्रिया-व ४. ती जळाल्यानंतर उत्पन होणान्या राखेचे प्रमाण यासंबंधी माहिती सांगतो. या दोन गोष्टी एकत्र आहेत म्हणून त्यांची माहितीही एकत्रच खाली दिली आहे. मेणबत्तीच्या वातीचे मुख्य गुण म्हटले म्हणजे १. तिची चांगली शोषकशक्ति. २.ती जळतांना स्वच्छ प्रकाश पडणे. ३. ती एक सारखी जळणे. ४. शेवटी ती सर्व भागाने पूर्णपणे जळणे व ५. सर्वात मुख्य गुण म्हणजे ती जळल्यानंतर तिच्यापासून फारच थोडी राख उत्पन्न होणे. इतके गुण तिच्यांत असले म्हणजे ती वात उत्तम आहे, असे समजावे. या दरेक गुणाची निराळी पण पद्धतवार माहिती देतो. १ शोषकशक्तीसंबंधांत मागे लिहिलेच आहे ते पहा. - २ स्वच्छ प्रकाश पडण्यास--पातळ होऊन तिच्या शेवटी च. ढलेले सर्व मेण शांतपणाने जळाले पाहिजे. .