पान:मेणबत्त्या.pdf/215

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१ मेणबत्तीच्या एका पुडक्यांत दरेक ७॥-८ इंच लांबीची व ५ तोळे वजनाची एक अशा ६ मेणबत्या असतात एक शेर घट्ट द्रव्यांत अशा ८ मेणबत्त्या करतात. एका मेणबत्तीचा व्यास पाऊण इंच म्हणजे ६ दोरे असतो व तिच्या वातीची जाडी पाऊण दोरा म्हणजे, इंच असते. याप्रमाणे वातीचे द्रव्य पाहून, त्याची रचना करून नंतर तीस इच्छित आकार द्यावा. २ वातीची शोषकशक्ति-हल्ली मेणबत्तीच्या वाती कापसाच्या किंवा तागाच्या दोन्याच्या करतात. या दोन्ही जाताचे दोरे एकत्र करून किंवा एकाच जातीचे दोरे एकत्र करून वाती बनवितात. मेणबत्ती जळतांना तिच्या ज्वालेच्या खालच्या भागाजवळ असलेले द्रव्य त्या ज्वालेच्या उष्णतेने पातळ होते; व केशाकर्षणाच्या नियमाप्रमाणे तें ज्वालेच्या ठिकाणी जाऊन पोचते. तेथें तें पातळ द्रव्य जाण्याचा मार्ग म्हटला म्हणजे त्या वातीच्या पदरांतील दोरे होत. या दोन्यांत . शोषकशक्ति दोन रीतींनी आणतां येते. १ ते दोरे पोकळ म्हणजे सच्छिद्र असे तयार केले पाहिजेत. व २ त्यांत माती कचरा वगैरे मळ नसला पाहिजे. पहिले काम तिच्यांतील दोयांस व पदरांस योग्य पीळ देऊन वात तयार केल्याने होऊ शकते. पण दुसरे काम में त्या दोन्यांतील मळ स्वच्छ करणे ते काही रसायनीक क्रिया त्या वातीवर केल्याशिवाय चांगलेसें होत नाही. तयार झालेल्या वाती अगदी स्वच्छ असल्या, तरी गोड्या पाण्यांत १-२ तास शिजविल्याने त्यांत असणारा किंचित मळ धुतला जातो. पण मळकट असल्या तर खाली लिहिलेल्या मिश्रणांत त्या शिजवून धुऊन काढतात. ते मिश्रणः