पान:मेणबत्त्या.pdf/214

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

विण्यास वरच्यापेक्षा जास्त पीळ घातलेल्या दोऱ्याच्या पदराची व जास्त घट्ट विणलेली वात वापरावी. याप्रमाणे नियमित दोरे एकत्र करून व त्यांस पीळ घालून तयार केलेल्या एक पदराच्या तीन चात्या घ्याव्या. त्यांचे तीन पदर खुले करून एका यंत्रांत घालून वेणीसारख्या चपट्या विणीची वात विणून काढावी. अशी एकच लांब वात एका चाकावर गुंडाळून ठेवावी. याप्रमाणे पुष्कळ चाके एकेका वातीने भरलेली अशी तयार करून कारखान्यांत ठेवावी. वातीच्या आकारांत फेरफार झाल्याने उत्पन्न होणारे दोष व ते निवारण करण्याचा उपाय सांगतो. १ मेणबत्ती जळतांना तिच्या सभोंवतीं कांचेचे आवरण ( गोळा ) असूनही जर तिच्या ज्वालेंतून धूर निवू लागला तर तिच्या वातींचा आकार वाजवी पेक्षा अधिक मोठा आहे असे समजावे. म्हणून तशी वात मागे सांगितल्याप्रमाणे काळजीपूर्वक बनवावी. २ जळतांना जी वात शेवटी वाकडी न होतां सरळ व ताठ रहाते, तिच्यांत दोन दोष असतात १ एक तर विणताना त्या वातीच्या पदरांस जास्त पीळ व वातीस जास्त ताण व दाब बसला असतो; किंवा २ पुढे सांगितलेल्या मिश्रणांत भिजविल्यानंतर तिच्यांतील पाणी साफ पिळून काढले नसल्याने त्या मिश्रणांतील द्रव्य त्या भागांत जास्त राहिले असते. म्हणून पुढे सांगितलेल्या मिश्रणांत वात भिजविल्यानंतर साफ व जोराने पिळून काढावी. परदेशांतून येणाऱ्या मेणबत्त्यांची जाडी व लांबी पाहून त्या त्या वातीचे किती पदर व दरेक पदरांत किती व कशा जाडीचे दोरे असतात हे एकवार लक्षपूर्वक तपासून सर्वांचे टाचण करून ठेवले तर फारच उपयोगी होईल. व अनुमाने व अनुभव करून काम करण्याचा त्रास चुकेल.