पान:मेणबत्त्या.pdf/213

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वापरतात. आतां प्याराफीन मेणाच्या मेणबत्यांच्या वातीचा आकार कसा असावा ते सांगतो. साधारण एक शेर प्याराफीनच्या १ किंवा २ मेणबत्या बनविणे असतील तर त्या वातीच्या तीन पदरांपैकी दरेक पदरांत १८ दोरे घालावे; एक शेर मेणांत ४-६ मेणबत्या बनविणे असतील तर दरेक पदरांत १४ दोरे; दरेक शेरांत दरेक मेणबती ९ इंच लांबी ची अशा ७ बनविणे असतील, अथवा तितक्याच मेणांत दरेक मेणबत्ती ५-६ इंच लांबीची अशा १४ मेणबत्या बनविणे असतील तर दरेक पदरांत ११ घालावे. सुमारे ८ इंच लांबीची दरेक अशा १० किंवा १२ मेणबत्या दर शेरांत बनविणे असतील तर अथवा ५-६ इंच लांबीची दरेक अशा १६-२० मेणबत्या दर शेरांत बनविणे असतील तर वातीच्या दरेक पदरांत ८ दोरे घालावे. याप्रमाणे पाहिजे तितके दोरे एकत्र करून वातीच्या एका पदराची जाडी तयार करावी. साधा दोरा निराळ्या चात्यावर गुंडाळून ठेवावा. नंतर पाहिजे तितक्या चात्यावरचे दोरे घेऊन ते एकत्र करून तो पदर निराळ्या एका चातीवर लागू करावा. ही निराळी चाती फिरविली म्हणजे त्या पदरास पीळ बसतो. पीळ बसल्यानंतर त्याच चातीवर तो पदर गुंडाळून ठेवावा. अशा पुष्कळ चात्या एक पदरी दोऱ्याच्या तयार करून ठेवाव्या. आतां त्या पदरास किती पीळ द्यावयाचा ते सांगतो. १ चरबी, मधमाशांचे मेण किंवा स्परम्यासिटी यांपैकी एकाच द्रव्याची मेणबत्ती बनविण्यास कमी पीळ घातलेल्या पदरांची व अगदी पोकळ विणलेली वात वापरावी. २ स्टिअरीन (घट्ट स्निग्ध आसीड) च्या मेणबत्त्या बनविण्यास साधारण बराच जास्त पीळ घातलेल्या पदरांची व जास्त घट्ट विणलेली वात वापरावी. ३ प्याराफीनच्या मेणबत्त्या बन