पान:मेणबत्त्या.pdf/212

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८४ प्रमाणे बुचकळलेल्या मेणबत्त्यांच्या वातीही विणून तयार करतात. मात्र त्या बिसमथ नाइट्रेटच्या द्रवात बुचकळून सुकवाव्या लागतात. या द्रवाचे प्रमाण व कृती पुढे दिली आहे. 'वात ही मेणबत्तीचा एक भाग आहे. म्हणून मेणबत्ती व तिची वात यांची जाडी सप्रमाण असल्याशिवाय, ज्वलनक्रिया बरोबर होऊ शकणार नाही. साधारण रीत्या पाऊण इंच म्हणजे सहा दोरे व्यासाच्या मेणबत्तीस ११ इंच म्हणजे पाऊण दोरा जाडीची वात असावी. म्हणजे ठोकळ मानाने मेणबत्तीचा व्यास एक इंच ठेवणे असेल तेथे एक अष्टमांश इंच जाडीची वात बनवून वापरावी. मेणबत्या एक शेर घट्ट द्रव्यांत किती बनवावयाच्या आहेत? या धोरणावर मेणबत्त्यांचे माप बसविलेले असते. मात्र त्यांची लांबी व जाडी गि-हाइकांच्या मागणीप्रमाणे कमजास्त ठेवावी लागते. उदाहरण--जसें एक शेरांत साधारण लांबीच्या ६, किंवा त्यापेक्षा कमी लांबीच्या ६, किंवा त्याहीपेक्षा कमी लांबीच्या ६ मेणबत्त्या बनवितात. याप्रमाणे कमी कमी लांब असणाऱ्या मेणबत्त्या अधिक अधिक जाड मात्र होतील. हीच प्रमाणे वात विणतांना तिच्या जाडीसही लागू करून त्या त्या जातीच्या वाती बनवाव्या. विणलेली वात चपटी असून तिच्या जाडीचे तीन पदर असतात. या प्रत्येक पदरांतील दोऱ्यांची संख्या कमजास्त केली म्हणजे तिची जाडी कमजास्त होऊ शकते. वातीच्या तीन पदरांपैकी दरेक पदरांत २० दोरे असतात. प्रत्येक दोरा गिरणीत निघणारा ३०-४०. नंबरचा असतो. या प्रकारच्या साधारण वाती असतात. यापेक्षा कमजास्त जाडीची मेणबत्ती बनविणे असेल तेथें कमजास्त दोऱ्यांची संख्या दरेक पदरांत घालून वाती बनवाव्या. याप्रमाणे विणून केलेल्या वाती मिन मेणबत्या व ओतीव ( मेणाच्या) मेणबत्या बनविण्याच्या कामीही लांबीच्या कमी कमी प्रमाणे वात बनवाव्या.