पान:मेणबत्त्या.pdf/211

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दाबून त्यास पीळ दिल्याशिवाय त्याचा दोरा बनवितात. नंतर जितक्या जाडीची वात पाहिजे त्या मानाने हा दोरा दुहेरी तिहेरी असा एका लाकडी तुकड्यांवर गुंडाळून इछित जाडीची व लांबीची वात तयार करतात. या वातीस पीळ नसतो. सबब तिचें एक टोक हाताच्या बोटांत किंवा इतर पकडीत पकडून तो लाकडी तुकडा फिरवावा म्हणजे तिच्यांतील दोऱ्यांस साधारण पीळ बसतो. यास वळून तयार करणे असे म्हणतात. अशा रीतीने वळून तयार केलेली लांब वात पुढील उपयोगाकरता दुसऱ्या लांकडी तुकड्यावर गुंडाळून ठेवावी. मात्र ती गुंडाळल्यानंतर पुनः खुल्ली होईपर्यंत तिचा पीळ कायम रहावा इतक्या जोराने ती मुंडाळावी. पण मेणबत्ती जळतांना अशी वळलेली वात बरोबर जळत नाही व तीस काजळी फार येते. हा या वातीमध्ये मोठा दोष आहे. तो घालविण्यास्तव नानाप्रकारच्या युक्त्या. काढल्या आहेत. १ जळतांना तिचा शेवट ज्वालेच्या बाहेर थोडा तरी वाकेल अशी योजना करावी. २ कोणी तिच्या उभ्या दोऱ्यांपैकी एका दोन्यांत बिसमथ नाइट्रेटची अगदी बारीक भुकटी दाबून बसवितात. नंतर हा दोरा इतर दोऱ्या बरोबर उभा ठेवून ती वात तयार करतात. ज्वालेच्या उष्णतेने जळणाऱ्या शेवटांत तो बिसमथ पातळ होऊन त्याचा एक लहानसा गोलक बनतो. त्या गोलकाच्या वननाने त्या वातीचे प्रज्वलित शेवट ज्वालेच्या बाहेर व खाली वाकले जाते. नंतर उष्णतेने त्यांतील राख ' हळूहळू उडून जाते. यामुळे त्या वातीस काजळी फार कमी येते. ३ अशीच वाकण्याची स्थिति उत्पन्न करण्यास त्या वातीचे उभे दोर एकापेक्षां एक कमी लांबीचा अशा रीतीने ठेवून ती वात विणतात. या रीतीने तयार केलेल्या वातीचा आकार गोल असतो. पण मिश्र मेण. बत्त्यांच्या वाती अलीकडे जशा विणून चपट्या तयार करतात, त्याच