पान:मेणबत्त्या.pdf/210

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८२ भाग ६ मेणबत्त्यांच्या वाती तयार करणे. साधारण रीतीने पहातां मेणबत्ती हा पदार्थ निराळ्या दोन पदार्थांचा मिळून बनलेला असतो. ते पदार्थः-१ जळणारे पांढरे व घट्ट द्रव्य (मेण अथवा स्टिअरीन) व २ हे द्रव्य पातळ झाले ह्मणजे त्यास ज्वालेत वाहून नेण्याचे जे साधन ती वात, हे आहेत. पहिला पदार्थ तयार करण्याची माहिती मागें दिलीच आहे. सबब मेणबत्त्यांच्या कामी लागणाऱ्या वाती कोणच्या पदार्थाच्या व कशा तयार कराव्या त्याची माहिती सांगतो. मेणबत्तीची वात तयार करतांना पुढे लिहिलेल्या चार बाबतींचा विचार प्रथम करावा लागतो. वातीचा आकार, २ तिची शोषक शक्ति, ३ तिची ज्वलन क्रिया व ४ ती जळल्यानंतर उत्पन्न होणाऱ्या राखेचे प्रमाण, ह्या त्यां चार बाबती आहेत. १ वातीचा आकार--हल्ली कापसाच्या किंवा तागाच्या दोन्यांच्या वाती बहुतकरून यंत्राने त्यांचे दोर वळून किंवा विणून तयार करतात. बुचकळून केलेल्या मेणबत्तीस, बिन पिळाचे झणजे कापूस दाबून केलेले दोरे एकत्र करून वात तयार करतात. आपल्या देशांत हातवाती तयार करतात. त्याप्रमाणे एकेक वातीचा एकेक दोरा तयार करून नंतर ते तीन दोरे एकत्रकरून वात करावी. असे बिन पिळाचे तीन दोरे एकत्र करून वात बनवितांना त्यांस थोडा पीळ दिला तरी हरकत नाही. दाबून काढलेली साधी चरबी ऊन करून तिच्यांत वाती वारंवार बुचकळून व सुकवून बुचकळलेल्या मेणबत्त्या (dip candles) तयार कस्तात. सबब या वातीचा भाग विशेष पोकळ व शोषक असावा लागतो. यास्तव स्वच्छ कलेला कापूस