पान:मेणबत्त्या.pdf/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६



तयार होतो पण उंच प्रतीत याची गणना होत नाही. हल्ली खोबऱ्याचे तेल आंगास लावण्याच्या सात फार वापरले जातें ह्मणून या तेलाचा साबू बनवितांना मुख्य व उप अशा दोन्ही रीतींची कामें करावी लागतात. याचे ७८ प्रकार आहेत. ह्मणून त्या दरएक रीतीस मध्यम फी ठेविली आहे. प्रथम या कामी पुस्तकांतील माहिती पाठरूपाने करून दिल्या नंतर सर्व क्रिया अनुभवीक रीतीने करवून घ्याव्या लागतात. नंतर परीक्षा घेऊन चुकत असलेल्या क्रिया पुनःपुनः शिकवून पूर्ण माहिती करून द्यावी लागते.

साबूच्या दरएक मुख्य रीतिची फी रुपये ३०,

 " दरएक उपरीतिची फी रुपये १५.
खोबरेल तेलाच्या साबूच्या दरएक रीतीची फी रुपये २०,
 वनस्पतिज तेलावर सलफ्युरीक आसिडाची क्रिया घडवून मेणब. यांचे घट्ट द्रव्य बनविण्याच्या रीतीची रुपये ४०.

 याप्रमाणे एकट्या दुकव्या शिकणारासाठी व्यवस्था करण्याची इच्छा आहे. जर देवास मुक्कामी वर्ग निघाला तर त्यास लहानशी प्रयोगशाळा जोड़न वर्गाचे काम सुरू होईलच. तसे झाले ह्मणजे इतर.पदार्थ कसकसे बनविणे त्याचे शोध करून तो तो वर्ग सदर शाळेस जोडण्यांत येत जाईल.

 रसायनिक प्रयोग करून नवे नवे पदार्थ बनविण्याची आवड मजला मुळापासून असल्याने मी पुष्कळ प्रयोग करून पाहिले आहेत; त्याजवरून विलायतेस जाऊन शिकून आल्यावांचून येथल्या येथे बरेच पदार्थ थोडे परिश्रमाने बनविता येतील असे मला वाटत आहे. परंतु या सर्व प्रयत्नास व्यवस्थीत स्वरूप दिल्याशिवाय व्यवहारांत याचा उपयोग चांग<बर>