पान:मेणबत्त्या.pdf/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५


मेणबत्यांचे घट्ट द्रव्य तयार करण्याचा अनुभव मी स्वतः४/५ प्रयोग करून घेतला आहे. याच रीतीचा हल्लीचे काळी उपयोग केला असता पुष्कळ मेणबत्त्या तयार होतील. या कामास त्रासदायक व किमती सामानही फारसे लागत नाही. साबूची कला शिकण्याचा वर्ग नच निघाला तर एकच्या दुकट्या शिकणारास येणारा खर्च काय होईल त्याचे दिग्दर्शन पुढे केले आहे. साबूचा लहानसा कारखाना काढण्यास सुमारे १०१२ रीतींची माहिती असावी लागते. त्या दहा बारा रीतींत कांहीं मुख्य रीती व काही उपरीती आहेत, त्यांचा खुलासा खाली दिला आहे. १ कोणतेही तेल घेऊन त्यास ३१४ वेळ कमीजास्त प्रमाणाच्या कास्टीक सोड्याच्या द्रवाबरोबर शिजवून साबू बनविणे व नंतर तो तपासणे. या कामी वेळ, मेहनत व द्रव्ये खरीदीचा खर्च जास्त येतो. ह्मणून अशा दरएक रीतीस मुख्य रीत झणतात. या प्रकारांत कोणत्याही तेलाचा साबू, राळेचा मिश्र साबू, मिश्र तेलांचा कचा साबू, व हलका आणि उंची पारदर्शक साबू इत्यादि बनविण्याच्या रीती येतात.
 २ वर मुख्य रीतीत लिहिलेला कच्चा साबू घेऊन त्यांत रंग, सुगंधी व इतर द्रव्ये मिळवून दळून वड्या पाडून ग्लेज देणे, किंवा हलके पदार्थ पीठ पाणी वगैरे मिळवून धुण्याचा साबू बनविणे (लाटा किंवा गोळे) ही कामें येतात. या रीतीस उपरीत ह्मणतात. या प्रकारांत हनी सोप, रोज सोप, ग्लिसराईन सोप, कार्बोलिक सोप, (३।४ प्रकारचे) मार्शमालो सोप, व्हाओलेट सोप, हिना सोप, केवडा, वाळा वगैरे सुगंधी साबू, व साबूच्या भुकट्या, गोळे व लाटा इत्यादि साबू येतात.
 ३ खोबरेल तेलाचा साबू बनविणे हे काम लवकर होते, असा पुकळांचा समज आहे. तरीपण या कामी उष्णतेचे अवधान व ढवळण्याची चलाखी ही दोन कामें अति महत्वाची आहेत. हा साबू लवकर