पान:मेणबत्त्या.pdf/22

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७



लासा होत नाही व होणारही नाही. अशी खात्री झाल्यानंतर वरील उपक्रमास आरंभ केला आहे. ही गोष्ट रा. व्यास यांस अवगत आहे. माझ्या प्रयत्नांची दिशा त्यांस उपयोगी व मान्य असल्यामुळे त्यांच्या मनांत मजविषयी अत्यंत आदर उत्पन्न झाला आहे. या कारणामुळे साबूच्या कारखान्यास जोडूनच प्रयोग शाळा काढण्याचा त्यांचा संकल्प झाला आहे. त्या कामी परमेश्वर त्यांस पूर्ण यश देवो, अशी त्या जगन्नियंत्याजवळ माझी प्रार्थना आहे. कदाचित रा. व्यास यांस या कामी अडचण आली तर माझा हेतु ( मला असलेली माहिती थोड्या खर्चात इतरांस देणे) अल्पांशाने तरी पार पाडण्यास्तव एकट्या दुकट्या शिकणाराकरितां वर लिहिलेली व्यवस्था सुचवून ठेविली आहे. तिचा उपयोग. करून घेणे उद्योगवृद्धीची इच्छा बाळगणाऱ्या देशहिताचंतकाकडे आहे.

अनुसूया लेपर हॉस्पिटल.

शंकर यज्ञेश्वर गर्गे,

ज्येष्ठ वद्य ६ शके १८२८.

हास्पिटल आसिस्टन्ट इनचार्ज

अनुसूया लेपर हास्पिटल, पोस्ट-शिनोर.