पान:मेणबत्त्या.pdf/207

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७९ रसायनीक, रीतीने काढलेल्या स्टिअरीक व पामिटीक आसिडांच्या उत्तम मेणबत्या उत्तरोत्तर अधिक लोकप्रिय आहेत. किमतीच्या मानाने मेण व प्याराफीन हे फार महाग पदार्थ आहेत. सबब त्या एकेकट्या द्रव्याच्या मेणबत्या बनविण्यापेक्षा ते ते पदार्थ स्टिअरीक आसिडांत अल्प प्रमाणाने मिश्र करून बनविलेल्या मेणबत्या किमतीने अधिक स्वस्त व गुणांत अधिक चांगल्या असल्याने लोकांस जास्त आवडतात यामुळे त्यांचा खप जास्त होतो. सबब अशाच प्रकारच्या मेणबत्या बनविण्याचा प्रयत्न प्रथम करावा. रसायनरीतीने स्निग्ध पदार्थातील काढलेली घट्ट स्निग्ध आसिडें यांस रसायन भाषेनें स्टिअरीक आसीड व पामिटीक आसीड असें व व्यापारी भाषेनें स्टिअरीन असें झणण्याचा परिपाठ आहे. जास्त उष्णमानावर पातळ होणारे व जास्त कठीण ह्मणजे घट्ट जें तें स्टिअरीक आसीड व त्यापेक्षा कमी उष्णमानावर पातळ होणारे व कमी घट्ट जें तें पामिटीक आसीड असते. कित्येक मेणबत्यांच्या पुडक्यावर बेलमान्ट स्पर्म असें जें लिहिले असते त्या मेणबत्या पामिटीक आसिडाच्या असतात. । पांचव्या भागांत लिहिलेल्या पहिल्या ५ रीतीनी में घट्ट स्निग्ध आसीड तयार होते, त्यांत स्टिअरीक व पामिटीक अशी दोन्ही घट्ट स्निग्ध आसिडें मिश्र असतात; आणि सहाव्या रीतीने तयार झालेले जे घट्ट स्निग्ध आसीड ते पामिटीक आसीड असते, आतां मागे लिहिलेल्या काम करण्याच्या कित्येक प्रकारांत रसायनिक व यांत्रिक कामास लागणारी बिकट प्रकारची भांडी इकडे बनविण्याची मोठी अडचण आहे. अगदी योग्य व प्रमाणशीर भांडी करणाऱ्या माणसांची उणीव अद्याप