पान:मेणबत्त्या.pdf/208

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८० ही आमच्या इलाख्यांत आहे, सबब त्यापैकींच्या एखाद्या प्रकारानें काम ' करण्याची इच्छा झाल्यास त्या योग्य भांडी परदेशांतून आणली पाहिजेत. आतां भांडी परदेशांतून आणली तरी त्या प्रकारानें काम करणारा मनुष्यही परदेशांतून आणिला पाहिजे. पण परदेशस्थ व पगारी नोकर माणसे अशी कामें काळजीने व चांगल्या रीतीने करीत नाहीत, असा अनुभव पुष्कळ ठिकाणी आला आहे, या मोठाल्या अडचणीमुळे मला असे वाटतें की अशा कठीण व शास्त्रीय पद्धतीच्या प्रकाराने काम करणारी योग्य हुशार व प्रामाणिक उद्योगी वीर स्वदेशी तयार होईपर्यंत ज्यांना मेणबत्यांचा कारखाना घालणे असेल त्यांनी १ चरबी व २ लार्ड दाबून स्टिअरीन ( साधे ) तयार करण्याची रीत, ३ मेण स्वच्छ करण्याची रीत; ४ चुन्याच्या साबणक्रियेची रीत; (पहिले दोन प्रकार) ५ स्निग्ध व घट्ट आसिडें तयार करण्याच्या तिसऱ्या रीतीच्या चौथ्या प्रकारची रीत ( डा. बाकची रीत ) व ६ सलफ्युरीक आसिडाने पातळ तेलें घट्ट करण्याची रीत (घट्ट स्निग्ध आसिडें तयार करण्याच्या ५ व्या रीतीचा पहिला प्रकार ) या सहा रीतींचाच प्रथम उपयोग करावा ह्मणजे फारसा त्रास व फारसा अधिक खर्च न होतां काम होत जाईल. प्रथम पुष्कळ पैसा खर्च करून व अधिक चौकशी ठेवून परस्थ वाकब माणसाकडूनही इतर कठिण प्रकारानेही ते काम करून घेता येण्यासारखें आहे. किमतीने पामिटीक व स्टीअरीक आसीड अनुक्रमें तीन साडेतीन आणे दर कच्चा शेरी पडून तयार झाले तर ठोकविक्रीने दर रुपयास सरासरी दोन आणे फायदा रहाण्याचा संभव आहे. कोणत्या रीतीने कोणत्या स्निग्ध पदार्थपासून किती घट्ट स्निग्ध आसिडे तयार होतात व त्यांचे पातळ होण्याचे उष्णमान काय असते वगैरे माहिती पुढील कोष्टकांत दिली.