पान:मेणबत्त्या.pdf/206

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०० भाग ओलिईक आसिडापैकी सुमारे ७० भाग स्टिअरीक आसीड (घट्ट स्निग्ध आसीड) बनविता येते. तसेच कोणी झुरर या नांवाचे गृहस्थ आहेत ते तर ओलिईक आसीडापासून खाली लिहिल्याप्रमाणे स्टिअरीक आसीड तयार करतात. ती रीत-ओलिईक आसिडावर प्रथम क्लोरीनची क्रिया घडवावी म्हणजे त्याचा बायक्लोराईड तयार करावा. नंतर या ओलिईक आसिडाच्या बायक्लोराईडवर खराब घाण येणाऱ्या हायड्रोजन नामक वायूची क्रिया घडवून स्टिअरीक आसीड बनवितात. परंतु या तिन्ही रीती म्हणजे हल्ली फक्त शास्त्रीय शोध आहेत. व्यापारी रीतीने यापासून काही फायदा होईल असे वाटत नाही. कारण या तिन्हीपैकी कोणत्याही रीतीने स्टिअरीक आसीड बनवितांना खर्च फारच होतो. म्हणून याप्रमाणे हल्ली इकडें घट्ट स्निग्ध आसीड बनविणे फायदेशीर होणार नाही. येथपर्यंत मेणबत्त्या बनविण्याचे घट्ट द्रव्य तयार करण्याची माहिती २६ रीतींच्या ४५ प्रकारांत दिली आहे. तसेच या प्रकारांनी काम करितांना निरनिराळ्या वेळेस जे रासायनीक किंवा साधे इतर पदार्थ तयार होतात तेही निराळे काढून रूपांतर करून किंवा जसेच्या तसेच हस्तगत करण्याची ही माहिती दिली आहे. हल्लीच्या सुधारलेल्या (चौकशीच्या) काळांत नुसती चरबी किंवा लाडे यांच्या, व दाबलेल्या खोबरेल तेलाच्या मेणबत्या लोकांस पसंत होतील असें वाटत नाही. साधारणपणे चरबी दाबून काढलेले स्टिअरीन काहीसे बरे असतें. सबब त्याच्या जरूर असेल तेथें स्वच्छ केलेल्या मधमाशाच्या मेणाच्या, व प्याराफीनच्या मध्यम आणि स्निग्ध पदाथीतून