पान:मेणबत्त्या.pdf/205

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३ मि. राडीसनच्या मताने तर हा ११३ रुपयांचा खर्चही कमी करता येण्यासारखा आहे. प्याराफिनच्या ऐवजी जड हायडोकार्बान असणारी खनिज तेले; व तीव्र सोडा द्रवाच्या ऐवजी लेब्लांकच्या रीतीच्या सोडा फ्याकटरीतील लाल तीब सोडा द्रव हे पदार्थ जर या कामी वापरले तर २२४० शेर पामिटीक आसीड तयार होण्यास सुमारे ६५ रुपये खर्च येईल. असें मि. राडीसन साहेब सुचवितात. पण त्या वस्तू परदेशांतून इकडे येईपर्यंत फाजील खर्चाचा बोजा वाढेल असे वाटते. सबब दुसऱ्या व तिसन्या रीतींच्या खर्चाची तुलना करून फायदेशीर रीत जी ठरेल तिचा उपयोग या कामी करावा हे श्रेयस्कर आहे असे मला वाटते. __या रीतीने काम करून घट्ट स्निग्ध आसीड बनविण्यांत होणारे फा. यदे पुढे लिहिले आहेत. १. इतर रीतींनी तयार झालेलें ओलिईक आसीड व पातळ वनस्पतिज तेले यांचाही उपयोग घट्ट स्निग्ध आसीड बनविण्याच्या कामी होतो. २. कच्चा माल खरीद करण्यांत बदलणारें भांडवल सुमारे शेकडा ३० या प्रमाणानें कमी लागते. ३ घट्ट स्निग्ध आसिडें असणान्या स्निग्ध पदार्थांपेक्षां ओलिईक आसीड व वनस्पतिज पातळ तेलें खरीद करण्यास खर्च कमी लागतो. ४. या रीतीने तयार होणारें घट्ट स्निग्ध आसीड साधारण कमी गुणाचें पण स्टिअरीनसारखे असते. इतके फायदे आहेत. इतर प्रयोगडीवाईल्ड व रेचलर या गृहस्थांनी काही प्रयोग करून असे सिद्ध केलें आहे की ओलिईक आसिडांत ब्रोमीन किंवा आयोडाईन यांपैकी एकाचेही अल्प प्रमाण मिळवून ते मिश्रण दाबाखाली गरम केले तर