पान:मेणबत्त्या.pdf/204

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हरण---चुन्याच्या साबणक्रियेने तयार झालेल्या १०० शेर ओलिईक आसिडावर जर या ६ व्या रीतीची क्रिया केली तर त्यापासून मेणबरया करण्या जोगें पामिटीक आसीड सुमारे ९१ शेर तयार होते. आणि उर्ध्वपातनाने तयार झालेल्या १०० शेर ओलिईक आसिडावर जर या ६ व्या रीतीची क्रिया केली तर मेणबत्त्या करण्याजोगें पामिटीक आसीड सुमारे ८७ शेर तयार होते. डा. बाकच्या रीतीने निघणारे ओलिईक आसीड हा मूळ स्निग्ध पदार्थ या रीतीने काम करण्यांत वापरावा झणजे त्यापासून निघणारे पामिटीक आसीड (घट्ट स्निग्ध आसीड) अधिक प्रमाणाने तयार होते. पण आपल्या देशांत ओलिईक आसिडापेक्षां पातळ व वनस्पतिज सेलें अधिक आहेत, व ती स्वस्त आहेत. ह्मणून आपणांस मेणबत्त्यांचे घट्ट स्निग्ध आसीड या तेलांपासूनच बनविणे भाग आहे.. सबब ओलिईक आसिडासंबंधी विशेष चर्चा करण्याचे फारसे कारण नाही. या रीतीने काम करण्यांत होणाऱ्या खर्चाचा अदमास खाली लिहिला आहे. १ तीव्र पोव्याश द्रव वापरून काम केले तर २३४० शेर पामिटीक आसीड तयार होण्यास सुमारे १९५ रुपये खर्च होतात. यांत प्याराफीन वापरावे लागत नाही तरी खर्च फार होतो. २ तीव्र सोडाद्रव वापरून काम केले तर प्याराफीन वापरावे लागते व ते थोडेसें फुकट ही जाते. तरी पण २३४० शेर पामिटीक आसीड तयार होण्यास सुमारे ११३ रुपये खर्च होतात. त्यांत मूळ स्निग्ध पातळ पदार्थाच्या दर १०० भागांस प्याराफीन १ भाग फुकट जाते, त्याचीही किंमत या ११३ रुपयांत धरली आहे.