पान:मेणबत्त्या.pdf/203

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७६ करतात. तेव्हां त्या उष्णतेने जड हायड्रोकार्बान असणारी हलकी तेलें जी त्या ओलिईक आसिडांत असतात, त्यांची वाफ होत असते. ती वाफ निराळ्या नळीतून मुद्दाम तयार केलेल्या चिमणींत सोडतात. या चिमणीच्या सर्व पोकळीत उभे खाने (कपे) होतील असे लोखंडी पत्रे बसविलेले असतात. त्या खान्यांत वर सांगितलेली तेलें जाऊन पडतात. तेथे ती थंड झाल्यावर काढून फडक्यांतून गाळून थंड हवेच्या ठिकाणी काही दिवस स्थिर ठेवतात. नंतर त्यांत प्याराफीन मेण तळी जमते. ती तेले पुनः फडक्यांतून गाळली ह्मणजे त्यांतील प्याराफीन फडक्यावर रहाते व तेलें फडक्या खालच्या भांड्यांत पडतात. याप्रमाणे निघालेलें प्याराफीन कोठारांत ठेवावे व तेलें जाळण्याच्या कामी वापरावी. किंवा दोन्ही विकून टाकावी. केवळ शास्त्रीय पद्धतीनेच जर विचार केला, तर या रीतीने पामिटीक आसीड तयार होत असतांना, क्याप्रिलीक आलकोहल, सिबेसीक आसीड, क्यापोईक आसीड व इतर स्निग्ध आसिडें त्याबरोबर अगदी अल्प प्रमाणाने तयार होतात. पण व्यापारी दृष्टीने त्यांचे महत्त्व नसल्याने ती निराळी काढण्याचे काम कोणी करीत नाही... घोड्याची चरबी व लोकरीपासून निघणारी चरबी या दोन स्निग्ध पदार्थाशिवाय सर्व जातीच्या प्राणिज व वनस्पतिज स्निग्ध पदार्थावर तीव्र सोड्याची रसायनीक क्रिया याप्रमाणे करून त्यांचे घट्ट स्निग्ध आसीड बनवितां* येते. मात्र ज्या रीतीने प्रथमचे ओलिईक आसीड बनविले असेल त्याप्रमाणे या ओलिईक आसिडांतून या रीतीने बनणाऱ्या घट्ट स्निग्ध आसिडाचे प्रमाण कम जास्त निघत असते. उदा.

  • या रीतीने घट्ट स्निग्ध आसीड बनवितांना मूळ स्निग्ध पदार्थ पातळ जें ओ. लिईक आसीड व पातळ जी वनस्पतिज तेले आहेत यांचाच उपयोग करावा.