पान:मेणबत्त्या.pdf/202

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आहे. माणुनच तें तयार तयार होते हैं कि व्यावें आटवून योग्य उपयोगी लावण्यास सांठवून ठेवावा. नंतर उर्ध्वपातनाने निघालेलें आसिटीक आसीड अशुद्ध असल्याने त्यास शुद्ध करावे लागते, यास्तव तें पुनः एकवार उर्ध्वपातनाने काढून घ्यावें झणजे स्वच्छ व शुद्ध आसिटीक आसीड तयार होते. हे विकलें असतां त्यास किंमत येते, ह्मणूनच ते तयार करून शुद्ध करण्याची माहिती मुद्दाम दिली आहे. याचे प्रमाण मूळ पातळ स्निग्ध पदार्थाच्या दर १०० भागापासून हे आसिटीक आसीड २-५ भाग निघत असते. झणजे वरच्या रीतींत १६५० शेर मूळ स्निग्ध पदार्थ वापरला आहे. त्यांतून सुमारे ४१ शेर शुद्ध आसिटीक आसीड निघतें, जशी खनिज पेट्रोलियम तेलांत जड हायड्रोकार्बोन असणारी हलकी तेले असतात, तशीच हलकी तेले कोणत्याही स्निग्ध पदार्थाच्या उर्ध्वपातनाने निघालेल्या ओलिईक आसिडांतही असतात. ही तेले दिव्यांत जळण्याच्या उपयोगी पडतात ह्मणून ती विकली असतां पैसे उत्पन्न होतात. आतां या रीतीने घट्ट स्निग्ध आसीड तयार करण्यांत मूळ स्निग्ध पदार्थ जर ओलिईक आसीड हा वापरला असेल तर त्यांतही अशी तेले असतातच आणि ओलिईक आसिडाचे पृथक्करण होत असतांना त्यास जेव्हां जास्त गरमी लागते, तेव्हां अशी तेले उडून नळीवाटे बाहेर जातात. ही तेलें फुकट न जाऊं देतां तीं धरून ठेविली तर त्यांचेही पैसे उत्पन्न होतील. सबब या रीतीने काम करतांना मूळ स्निग्ध पदार्थ ओलिईक आसीड वापरला असेल तर त्यांतील अशी तेल हस्तगत करण्याचा उपाय करणे हे आवश्यक काम आहे. यास्तव अशा तेलें कशा रीतीने काढून घ्यावी याची माहिती मुद्दाम खाली दिली आहे. ती रीत--तीव्र सोडाद्रव ४१° बा, हा. अंशाचा व ओलिइक आसीड काडतुसांत टाकल्यानंतर त्यास उष्णता देण्याची सुरवात