पान:मेणबत्त्या.pdf/201

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

द्रवाच्या तळाशी त्या हौदांत जमतात, व सोडा आसिटेट या पदार्थाचे कण त्या हौदाच्या उभ्या भिंतीवर त्या द्रवामध्ये तरंगत असतात, सबब हे तिन्ही पदार्थ निराळे करून तो द्रव फार शुद्ध व बा. हा. ४१ अंशप्रमाणाचा बनवावा लागतो. या हेतूनेच घर तीव्र द्रव प्रथम बा. हा. ४३° अंशप्रमाणाचा बनवावा असे सांगितले आहे.४३ अंशाच्या तीव्र सोडा द्रवांतून तीन पदार्थ निरळे काढले म्हणजे तो कमी प्रमाणाचा (४१° बा. हा. अंशाचा ) शेवटी तयार होतो. तीव्र सोडा द्रवांतील इतर पदार्थ निराळे करण्याची माहिती--तीव्र सोडा द्रव (४३) स्थिर ठेवला ह्मणजे प्रथमचे दोन पदार्थ त्याच्या तळाशी कणरूपाने जमतात. सबब. सोडा आसिटेटच्या कणासह वरचा तीव्र सोडा द्रव त्या हौदांतून एका नळीने काढून एका मध्यवर्ती यंत्रांत टाकावा. कोणताही द्रव या मध्यवर्ती यंत्रांत घालून गाळला असतां त्या द्रवांत तरंगत असलेले कण त्या द्रवापासून निराळे काढतां येतात. हा गुण या मध्यवर्ती यंत्रांत असतो. या यंत्रास इंग्रजीत सेंट्रीफ्युगल मशीन ( Centrifugal machine ) ह्मणतात. नंतर तीव्र द्रवाच्या हौदांत तळी जमलेले सोडा सलफेट व सोडा कार्बोनेट या पदार्थाचे कण निराळे काढून ठेवावे व त्यांचा योग्य उपयोग करावा. मध्यवर्ती यंत्रांतून ते मिश्रण गाळले झणजे तीव्र सोडा द्रव बाहेर निघतो, तो एका स्वच्छ हौदांत ठेवावा. आणि सोडा आसिटेट जो त्या गाळण्याच्या यंत्रांत रहातो तो त्यांतून बाहेर काढून उर्ध्वपातनाच्या भांड्यांत शकावा. त्यांत थोडें सलफ्युरीक आसीड मिळवून ते मिश्रण जोराने ढवळावें झणजे सोडासल फेट व आसिटीक आसीड हे पदार्थ रसायन रीतीने त्यांत तयार होतात. नंतर त्या मिश्रणाचे उर्ध्वपातन करावे ह्मणजे अशुद्ध आसि. टीक आसीड बाहेर निघतें व सोडा सलफेट कण अथवा द्रवरूपाने उर्घ पातनाच्या भांड्यांत रहातो. तो त्यांतून काढून घेऊन द्रव असल्यास